नाशिक – (प्रतिनिधी) – रोबोटिक शस्त्रक्रिया सारख्या अत्याधुनिक तंत्राबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या गोष्टींना वैद्यक क्षेत्रातही शिरकाव केला आहे . अर्थात अशी तंत्रे सहजगत्या आत्मसात करण्याची क्षमता भारतीय डॉक्टरांमध्ये आहे. आणि हे सर्व आपण कमीतकमी खर्चात उपलब्ध करत असल्याने लवकरच भारत वैश्विक मेडिकल हब बनण्याकडे वाटचाल करत आहे.” असे प्रतिपादन संजय येनपुरे , विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परीक्षेत्र यांनी केले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी नाशिक जिल्हा शाखा आणि एसआरव्ही हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक रेडक्रॉस चे चेअरमन डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी होते तर ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भरत केळकर यांची सन्माननीय उपस्थिती कार्यक्रमास लाभली होती. यावेळी व्यासपीठावर डॉ सुनील औंधकर , सचिव नाशिक रेडक्रॉस , डॉ प्रशांत भुतडा , खजिनदार , डॉ. संदीप जाधव , सेंटर हेड , डॉ. चेतन जैन , संचालक ,डॉ. वसिष्ठ नामपल्ली, फिजिशियन एसआरव्ही हॉस्पिटल ,डॉ चन्द्रशेखर नामपूरकर, व्हाईस चेअरमन, डॉ. प्रतिभा औंधकर , डॉ. नितीन बिर्ला , प्रीती झवर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भरत केळकर यांनी याप्रसंगी आपत्कालीन परिस्थितीत देशोविदेशी घेतलेल्या शिबिरांचे अनुभव कथन करताना भारतीय डॉक्टरांना सर्वत्र मोठ्या आदराने पाहिले जात असल्याचे सांगितले . डॉ सुनील औंधकर यांनी प्रास्ताविकात गुणवंत सोहळा आयोजनामागचा उद्देश सांगून शहरी ग्रामीण असा भेदाभेद न करता समन्वयाने काम करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी अध्यक्षीय भाषणात विविध स्तरांवर रेडक्रॉस करत असलेल्या मानवतावादी कार्याची सविस्तर माहिती दिली.

केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी आणि विशेष कामगिरी करणाऱ्या सेवाभावी डॉक्टरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात नाशिक शहरातील आयएमए, एफपीए, निमा, न्यू निमा , पीएमए, एमपीए, एसएडीए , पाथर्डी फाटा तसेच गोदाकाठ , सिन्नर, पिंपळगाव , त्र्यंबकेश्वर , लासलगाव , निफाड , चांदवड , मालेगाव आदी भागातील वैद्यकीय संघटनांचा समावेश होता .
पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रतिभा औंधकर आणि डॉ. प्रशांत भुतडा यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती पाटील आणि डॉ रत्ना चोपडे यांनी केले तर डॉ चन्द्रशेखर नामपूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी योगेश दिघे, संदीप सांगळे, संतोष आहेर , सचिन चव्हाण , सुशांत शिलवंत , निलेश परझने , सागर चासकर , वैभव गोवर्धने, चंद्रकांत गोसावी , सुनील गांगुर्डे , मंदार कोळेकर , जयश्री कुलथे , मंगला कस्तुरे , सारिका गुप्ते प्रयत्नशील होते .








