Saturday, November 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपचं आठ नऊ वर्षातील प्रत्येक पाऊल ओबीसीविरोधी,त्यांच्याकडून ओबीसी प्रेमाची नौटंकी सुरु, हरी नरकेंचा आरोप

Desk Team by Desk Team
27/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read


March 24, 2023
पुणे.प्रतिनिधी
Hari Narke : ललित मोदी, नीरव मोदी हे आर्थिक घोटाळेबाज गुन्हेगार आहेत. गुन्हेगाराला जात धर्म नसतो. त्याला कायदा आणि घटनेप्रमाणे शिक्षा व्हायला हवी. ते ओबीसी आहेत असे सांगणे हाच ओबीसींना बदनाम करण्याचा कपट अजेंडा आहे. असल्याचा आरोप देखील हरी नरके यांनी केला आहे.
‘सर्व चोरांचे नाव मोदी कसे काय असते’ असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत कर्नाटकच्या प्रचार सभेत केले होते. राहुल गांधी यांनी मोदी या अडणावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाज बांधवांचा अपमान केला, असा दावा करत भाजपने देशभर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. ओबीसी समाजाचा अपमान राहुल गांधींनी केल्याचा आरोप भाजप करत आहे. यावरून आता जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी आंदोलन करणाऱ्याला भाजपला खडे बोल सुनावले आहेत. ‘भाजपाकडून सध्या ओबीसी प्रेमाची नौटंकी चालू आहे. हे पुतनामावशीचे प्रेम सध्या उफाळून का आले आहे? ज्यांनी आजवर ओबीसीचा सतत द्वेष केला, आर्थिक व शैक्षणिक कत्तल केली त्यांना आज ओबीसीचा एव्हढा पुळका का आलाय? असा सवाल हरी नरके यांनी केला आहे.
‘गेल्या आठ नऊ वर्षातले यांच्या सरकारचे प्रत्येक पाऊल ओबीसीविरोधी होते. आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचा हक्काचा स्कॉलरशिप निधी भाजप सरकारने उच्च जातीतील गरीबांकडे वळवला. (EWS) मुळात तो इतका तुटपुंजा होता की दरडोई दरवर्षी २२ रुपये म्हणजे महिन्याला दिड ते पावणेदोन रुपये, अशी घनघोर चेष्टा करणारे कोणत्या तोंडाने ओबीसीबद्दल बोलत आहेत? असा प्रश्न देखील नरके यांनी भाजपला विचारला आहे.
ओबीसींचा विकास रोखून धरण्यासाठी ओबीसी जनगणना रोखणाऱ्या मोदी सरकारला ओबीसीबद्दल बोलायचा अधिकारच नाही. रोहिणी आयोग नेमून ज्यांनी ओबीसीचे तुकडे केले त्यांनी ओबीसीबद्दल बोलावे? यांना ओबीसी वोटबँक हवीय पण ओबीसी सक्षम व्हायला नकोय, अशी टीका हरी नरके यांनी केली. मंडल आयोग उधळून लावण्यासाठी अडवाणींनी रथ यात्रेचे पाऊल उचलले. व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा बीजेपीचे राज्यातील नेते धरमचंद चोरडिया मला म्हणाले होते, ओबीसी ही आमची धार्मिक हक्काची मतपेढी आहे. मंडल आयोग लागू करून व्हीपी ती पळवणार असतील तर आम्ही सरकार पाडू. मंडल आयोगाला संपूर्ण विरोध करूनही बुद्धिभेद आणि खोटा प्रचार यांच्या जोरावर भाजपने ओबीसी वोटबँक टिकवून ठेवली. असं नरके म्हणाले आहेत.

Desk Team

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

चार मुलांना घेऊन विहिरीत उडी घेतली, नंतर भीती वाटली, एका मुलीसोबत बाहेर पडली, पण घडलं अघटित.

Next Post

मंदिरात सापडली २ हजार मेंढ्यांची मुंडकी; सगळी रांगेत मांडलेली; प्राचीन अवशेषांचं रहस्य काय?

Next Post

मंदिरात सापडली २ हजार मेंढ्यांची मुंडकी; सगळी रांगेत मांडलेली; प्राचीन अवशेषांचं रहस्य काय?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

बोदवडकरांची प्रतीक्षा संपली! नवनियुक्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे लवकरच पदभार स्वीकारणार; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

बोदवडकरांची प्रतीक्षा संपली! नवनियुक्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे लवकरच पदभार स्वीकारणार; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर

शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d