Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपाच्या जाहीरनाम्यात रयतेच्या सूचनांचा विचार वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/10/2024
in राजकारण
भाजपाच्या जाहीरनाम्यात रयतेच्या सूचनांचा विचार वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून त्यासाठी राज्यभरातील सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा स्वीकार करत येत्या काही दिवसातच पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार असल्याची माहिती वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी सहकार, बाल कल्याण, ज्येष्ठ नागरिक कल्याण, सामाजिक न्याय यासह 18 महत्वाच्या घटकांचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाशासित राज्यांतील उत्तम तरतुदीही समाविष्ट केल्या जातील. जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे हे पाहण्यासाठी विभागनिहाय समित्या नेमण्यात येतील. अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे सारे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टिनेही व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण शक्तिनिशी काम करण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारच्या कार्यकाळात दरडोई उत्पन्नात वाढ झाली. गेल्या 54 वर्षांत जे झाले नाही ते आमच्या साडेसात वर्षांच्या कालावधीत झाले. भाजपाचा जाहीरनामा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नसून कायमस्वरुपी त्यात वाढ होत राहील. नागरीकांना संवादातून समाधान आणि प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील असे देखील कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडुन सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Next Post

जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारसंघा करिता खर्च निरीक्षकपदी हरकेश मीना आणि रोहीत इंदोरा यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo