Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले

पाचोरा- -(प्रमोद सोनवणे) – येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कोरोना (कोविड-१९) या महामारी चा वाढता प्रादुर्भाव बघता पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेऊन दोघे तालुक्यातील आर्थिक व दुर्बल घटकांतील तसेच रोजंदारी कामगारांसह हातावर पोट भरणार्‍या नागरिकांच्या आणि रेशन कार्ड धारकांना धान्य मिळविण्यात येणाऱ्या समस्यांबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांसह पाचोरा प्रांताधिकारी यांना त्यासंबंधी निवेदन देण्यात आले.त्यात प्रामुख्याने खालील मुद्दे अमोल शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
१) आर्थिक व दुर्बल घटकातील व हातावर पोट भरणाऱ्या रोजंदारी कामगारांसह काही नागरिकांना शिधापत्रिका उपलब्ध नसल्याने त्यांना शासनाच्या माध्यमातून धान्य मिळण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी.
२) काही नागरिकांना शिधापत्रिका असून देखील १२ अंकी नंबर नसल्याने धान्य मिळविण्यास अडचणी उपस्थित होत आहेत परंतु त्यांना नियमात शिथिलता आणून चालू महिन्यापासून धान्याची त्वरित व्यवस्था करून देण्यात यावी.
३) केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील चालू महिन्यापासून धान्य मिळावे तसेच त्यांना मिळणारे सदर धान्य अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार या दराने मिळावे.
४)प्रत्येक महिन्याला गहू व तांदूळ सोबत डाळी देखील बाजारभावापेक्षा अल्पदरात उपलब्ध करून देण्यात याव्यात.
५) स्वस्त धान्य पुरवठादारांना वाढीव पुरवठा करून नागरिकांना वेळेवर सुरळीत पुरवठा होणे बाबत उपाय योजना करण्यात यावी.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने संचारबंदी अजून वाढवण्याचे जाहीर केले असल्याने शासनाने सदर निवेदनात उपस्थित केलेल्या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी तालुका सरचिटणीस गोविंद शेलार व संजय पाटील उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून गरजूंना मदतीचा हात

Next Post

सहायता निधीसाठी मनोज कुमार पाटील कुटुंबीयांतर्फे ३१ हजारांची मदत

Next Post
सहायता निधीसाठी मनोज कुमार पाटील कुटुंबीयांतर्फे ३१ हजारांची मदत

सहायता निधीसाठी मनोज कुमार पाटील कुटुंबीयांतर्फे ३१ हजारांची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo