Tuesday, April 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार राजूमामा भोळे यांना शहरातून वाढला प्रतिसाद…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार राजूमामा भोळे यांना शहरातून वाढला प्रतिसाद…

रांगोळ्या, फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सुशोभित करून भगवान नगरात आ. राजूमामा भोळे यांचे भव्य स्वागत

जळगाव – (प्रतिनिधी) – शहरातील भगवान नगर भागात पूर्ण गल्लीमध्ये सडा-समार्जन करून रांगोळ्या व फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सुशोभीत करून शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळेला आबालवृद्धांसह महिला भगिनींनी औक्षण करून प्रत्येक घरातून पुष्पहार गळ्यात टाकून आ. राजूमामा भोळे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. नागरिकांचे प्रचंड प्रेम पाहून आ.राजूमामा भोळे यांनी भारावून जात आभार मानले.

भूषण कॉलनी येथील काशी विश्वेश्वर मंदिर येथे पूजा करून आ. राजूमामा भोळे यांनी सोमवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तिथून कोल्हे नगर, मुंदडा नगर, अंबिका हौसिंग सोसायटी भगवान नगर, शास्त्रीनगर, रामानंदनगर, विवेकानंद नगर मार्गे वाघ नगर परिसरात प्रचार रॅलीचा समारोप झाला. मार्गात महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आशाताई कोल्हे, माजी नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, वसंतराव कोल्हे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठांचे आ. भोळे यांनी आशीर्वाद घेतले.

माजी महापौर ललित कोल्हे यांच्या घरी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी यांनी काढलेली “विश्वास जुना, राजूमामा पुन्हा” या शीर्षकाखालील रांगोळी रॅली दरम्यानची आकर्षण ठरली. रॅलीच्या शेवटी वाघ नगर परिसरात माजी नगरसेविका उषाताई संतोष पाटील यांच्या घरी भाजप,शिवसेना व महायुती पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीमध्ये भाजप महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक गायत्री राणे, उषाताई पाटील, मंडळ क्रमांक ६ चे अध्यक्ष बापू कुमावत, अजित राणे, राजेंद्र खैरनार, संतोष पाटील,जीवन अत्तरदे, पिंटू बारी, चंद्रकांत बेंडाळे, रवि बारी, ओंकार राणे, विनोद भामरे, प्रवीण पाटील, ज्योती निंभोरे, रेखाताई पाटील, नीता काबरा जयश्री पाटील, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी कोल्हे, पियुष कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लता मोरे, विनोद देशमुख, जयश्री कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, विकी बागुल, सिद्धांत मोरे, बाबा म्हसदे, केतन वाणी, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मा. राज ठाकरे म्हणजे नेतृत्वाचा एक तडफदार आवाज-ॲड जमील देशपांडे

Next Post

आ. राजूमामा भोळेंचे चिमुकले राम मंदिरात साकडे, गांधी नगर, गणेश नगर भागात काढली रॅली

Next Post
आ. राजूमामा भोळेंचे चिमुकले राम मंदिरात साकडे, गांधी नगर, गणेश नगर भागात काढली रॅली

आ. राजूमामा भोळेंचे चिमुकले राम मंदिरात साकडे, गांधी नगर, गणेश नगर भागात काढली रॅली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d