Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मतदान जनजागृतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – आपली लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी विधानसभा निवडणूकीत अधिकाधिक मतदारांनी सहभागी होण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत नाविन्यपुर्ण उपक्रम राबवुन मतदान जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. जिल्ह्यात मतदान जनजागृतीबाबत स्वीप समिती सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली  त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीत जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सदस्यांकडून नियोजन व संकल्पना याबाबत चर्चा केली.

            डॉ.अविनाश ढाकणे म्हणाले जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यत मतदानाचा संदेश पोहचविण्यासाठी व मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होण्यासाठी सर्वांनी कल्पक उपक्रम राबवा. प्रत्येक विभाग, शाळा, महाविद्यालय, अशासकीय संस्था (एन.जी.ओ.) यांनी मतदान जनजागृती कार्यक्रमात योगदान देणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील मागील निवडणूकीची मतदानाची टक्केवारी पाहता शहरी भागातील मतदारसंघात मतदान कमी होत असल्याने त्यासाठी विविध उपक्रम राबवून गतवेळी कमी मतदान झालेल्या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी  दिल्या.

            जिल्ह्यातील रेल्वे स्थानक, बसस्टँड आदी वर्दळीच्या ठिकाणी तसेच सर्व बाजारपेठ, बँक, मॉल्स, सिनेमागृह यांच्या दर्शनी भागात मतदान जनजागृती बाबत बॅनर्स लावावीत. मतदानाच्या दिवसापुर्वी सर्व मतदारांना मतदार चिठ्ठी पोहोच करण्यात यावी. महिला मतदारांनी मतदानात सहभागी होण्यासाठी अशासकीय संस्थांनी प्रयत्न करावेत. मतदानाच्या  दिवशी  वयोवृध्द, ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्ती यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याबाबत देखील यावेळी सूचित करण्यात आले. प्रत्येक नागरीकांनी मतदानाचा हक्क स्वयंस्फुर्तने बजावावा तसेच इतरांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

            या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम एस. लोही, सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था बी.बी.पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत बिरार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण आर.आर. तडवी, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील तसेच तालुका स्वीप नोडल अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी तसेच अशासकीय संस्थांचे  प्रमुख  उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पिंपळगाव हरेश्वर येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली;मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

केसीई शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’ उत्साहात

Next Post
केसीई शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’  उत्साहात

केसीई शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 'दीक्षारंभ' उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo