Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सामाजिक अंतराचे पालन करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत


उस्मानाबाद, दि. 5 (जिमाका) :- जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना महाराष्ट्र शासनाने दि. 27 डिसेंबर, 2019 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतकऱ्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू आहे. या योजनेअंतर्गत दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी 519 गावातील 5 हजार 470 पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आज अखेर एकूण 66 हजार 727 लाभार्थी शेतकऱ्याच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी दि. 4 एप्रिल 2020 पर्यंत 54 हजार 285 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. तर 12 हजार 442 शेतकऱ्याचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे. आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी 51 हजार 970 शेतकऱ्याचे कर्जखात्यावर 384 कोटी 79 लाख रुपये जमा करण्यात आलेली आहेत. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने चालू आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य आहे.
ज्या शेतकऱ्यानी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी सामाजिक अंतर (Social Distance) चे पालन करुन आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधावा आणि आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आधार प्रमाणिकरण प्रक्रिया दरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास रक्कम अमान्य पर्याय उपयोगात आणण्यापूर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्जरकमेची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उस्मानाबाद व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

6 मे पासून पुढील आदेशापर्यंत मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे आदेश

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

Next Post
65 वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु

जळगाव जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo