Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यात 24 हजार रुग्णांवर उपचार;योजनेत म्युकरमायकोसिस आजारावर होणार मोफत उपचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यात 24 हजार रुग्णांवर उपचार;योजनेत म्युकरमायकोसिस आजारावर होणार मोफत उपचार


जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत 996 प्रकारच्या पध्दतीवर उपचार केले जातात. शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवून आता पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसोबत मर्यादित कालावधीसाठी पांढरे रेशन कार्डधारकांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात कोविड-19 या आजाराच्या 4 हजार 19 रुग्णांवर तर 20 हजार 29 नॉनकोविड रुग्णांवर उपचार केले आहेत. अशी माहिती डॉ. गोपाल जोशी, जिल्हा समन्वयक, राज्य आरोग्य हमी सोसायटी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
सद्यस्थितीत कोविड साथरोग परिस्थितीमध्ये कोविड-19 च्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) लक्षणे आढळून येत आहेत. म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचाराकरिता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्जिकल पॅकेजेस 11 व मेडिकल पॅकेजेस 8 मध्ये उपचाराची मुभा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत प्रति कुटुंब, प्रति वर्षी दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. म्युकरमायकोसिस या आजारासाठी विमा संरक्षणापेक्षा अधिकचा खर्च आल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर अधिकचा खर्च भागविण्यात येणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी म्हटले आहे.
म्युकरमायकोसिस या आजारातील उपचारामध्ये Antifungal औषधे हा महत्वाचा भाग आहे. संबधित औषधे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सदरची औषधे महागडी आहेत. जळगाव जिल्ह्यात ही औषधे (अॅफोटेरीसीन बी) शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत रुग्णालयात पात्र लाभार्थीस शासनाकडून मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी लागणारी बहुआयामी विशेष सेवा, या योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव आणि डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध आहेत.
या योजनेतंर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णाचे रेशन कार्ड व आधार कार्ड रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या आरोग्य मित्राकडे देणे आवश्यक असून या योजने अंतर्गत म्युकरमायकोसिसवर उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येतो. जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विक्रीस बंदी असलेले बियाणे विकणाऱ्या दुकानदाराचा परवाना कृषि विभागाने केला कायमस्वरुपी रद्द

Next Post

कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागात आरोग्य सुविधांचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागात आरोग्य सुविधांचे नियोजन करावे - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo