Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महापुरुषांचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी- किशोर पाटील कुंझरकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जाहिरात

एरंडोल(प्रतिनिधी)- जीवन जगत असताना जीवनात सामाजिक व नैतिक मूल्य जोपासण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असून सर्वांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. तसेच जीवनात सर्वच महापुरुषांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे उपयुक्त असून माँ साहेब राजमाता जिजाऊ या आदर्श संस्कार पीठ आणि मातृशक्तीचा सर्वोच्च मानबिंदू आहेत, त्यांचे विचार सर्वांसाठी व व समाज सुधारणांच्या जडणघडणीसाठी महत्वपूर्ण आहेत. स्वामी विवेकानंद यांचा आदर्श युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक मराठा सेवा संघाचे एरंडोल तालुका अध्यक्ष राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी किशोर पाटील कुंझरकर यांनी दिनांक १२ रोजी एरंडोल येथील शिक्षण विभागाच्या वतीने गटसाधन केंद्रात आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख नारायण बोरसे, ग स सोसायटी संचालक भाईदास पाटील, सपकाळे सर, मंदार वडगावकर व शिक्षक वृंद आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी व सर्वांनी अभिवादन केले. पुढे बोलताना कुंझरकर म्हणाले की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज ४२२ वी जयंती आहे आजही त्यांचे विचार जीवन कार्य राष्ट्रनिर्माणासाठी सर्वांना आवश्यक व उपयुक्त आहे म्हणून सर्वच शासन त्यांच्या विचारांचा आधार घेतात. तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय म्हणून माँ साहेबांना अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानावरून बोलताना गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांना  जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य प्रेरणादायी आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक शिक्षक व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेतुन बनवली मानवी पचनसंस्थेची प्रतिकृती

Next Post

राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo