Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्रजनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ व राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्रजनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ व राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जळगाव-येथील काव्यरत्नावली चौकात शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक आणि देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक आंदोलनातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
प्रारंभी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले . तद्नंतर “नमन सावित्रीला” या क्रांतिकारी ओवीचे सादरीकरण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना वंदन करण्यात आले .
ऍड कोमल गोंधळी यांनी सावित्रीला नमन या ओवीचे गायन केले . त्याच सोबत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी ” सावित्रीबाई जन्मोत्सव ” या ५० पुस्तकांचे उपस्थितांना मोफत वितरण केले .
याप्रसंगी मुकुंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन संघर्षावर विविध उदाहरणे देऊन क्रांतीमुल विचार मांडुन प्रबोधन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे यांनी करून सूत्रसंचालन प्रा. प्रीतीलाल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले .
यावेळी ” जय ज्योती , जय क्रांती ” , ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विजय असो ” , ” सावित्रीची मुले आम्ही मागे आता राहणार नाही ” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी रमेश सोनवणे , मंगलाताई सोनवणे , ऍड. राजश्री भालेराव , तेजस्विनी पाटील , ऍड. वनिता शिंपी , प्रतिभा भालेराव , चंदन बिऱ्हाडे , श्रीकांत मोरे , प्रा. सत्यजित साळवे , भैय्या पाटील , किरण कानडे , डॉ. मिलिंद बागुल , राहुल नेवे सागर कुटुंबळे , विवेक खर्चे , ललित परदेशी , प्रभाकर सुरवाडे , सौरभ बोरसे , चारुदत्त पिंगळे , संजय तांबे , विजय करंदीकर , संतोष सपकाळे , नाना मगरे ,आकाश सपकाळे , कृष्णा जमदाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित रक्तदान शिबिरात 51 दात्यांनी केले रक्तदान

Next Post

जामनेरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने क्रांति ज्योति सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo