Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) ने CHB च्या शिक्षकांच्या दरमहा वेतन मिळण्यासाठी घेतली सहसंचालकांची भेट”(“Maharashtra Students Union (MASU) met with Joint Director to get monthly salary of CHB teachers”)

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/01/2022
in जळगाव, राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
“महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) ने CHB च्या शिक्षकांच्या दरमहा वेतन मिळण्यासाठी घेतली सहसंचालकांची भेट”(“Maharashtra Students Union (MASU) met with Joint Director to get monthly salary of CHB teachers”)

जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या शिष्ट मंडळाने सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगांव यांची भेट घेऊन उत्तर महाराष्ट्र परिसरातील तिन्ही जिल्ह्यातील विद्यापीठ व महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या हजारो CHB च्या शिक्षक, प्राध्यापक यांच्या दरमाह मानधन मिळावे, या साठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने दि.१४/११/२०१८ आणि दि. २२/१०/२०२१ रोजी शासन निर्णय काढून CHB वर काम करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांसाठी नियम व अटी लागू केलेल्या आहेत. परंतु, त्यातील बऱ्याच तरतुदी महाविद्यालये, विद्यापीठ आणि सहसंचालक अंमलात आणत नसल्याचे दिसते. त्यासाठी संचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे यांनी दि. ०६/०१/२०२२ रोजी सर्व सहसंचालकांना उद्देशून परिपत्रक काढून शासन निर्णयातील तरतुदींचे काटेकोर पालन करून सर्व महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर (CHB) कार्यरत असणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांचे वेतन दरमहा सेवार्थ/एचटीई प्रणाली द्वारे करावे, असे आदेशित केले. तरीही १२ दिवस उलटूनही कोणतेही परिपत्रक किंवा कार्यवाही केली नसल्याचे नुकतेच महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ला संबंधितांनी कळविले. त्यावर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून आज मासूच्या शिष्ट मंडळाने डॉ. संतोष चव्हाण, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगांव यांना निवेदन देऊन भेट घेतली. भेटीदरम्यान शिक्षकांचे वेतन व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजना याबाबत सविस्तर चर्चा झाली, शिष्यवृत्ती योजना बाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही विद्यार्थ्यांपर्यंत हया योजना पोचत नाहीत, अशी खेदजनक माहिती सहसंचालकांनी दिली. त्यासाठी, मासू सारख्या विद्यार्थी संघटना पुढे आल्यातर हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. अशी अपेक्षा व्यक्त केली व CHB च्या शिक्षकांच्या वेतन प्रक्रियेबाबत आजच परिपत्रक काढून संबंधितांना पाठवितो, असेही आश्र्वासित केलं. याप्रसंगी शिष्यवृत्ती बाबत काही अडचणी आल्यास माझ्यासह, श्री. राम राठोड यांच्या कडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल; असे सांगितले.

या वेळी मासु’चे जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आव्हान केले की, ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मध्ये काही अडचण येत असल्यास मासू’शी संपर्क साधावा. निवेदन देण्याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन यांच्या सह पवन पाटील,श्रेयस चौधरी, भावेश पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज ४६९ कोरोना रुग्ण

Next Post

‘दृष्टी’दोष दूर करणारे ‘कांताई नेत्रालय’(‘Kantai Netralaya’ which removes ‘vision’ defects)

Next Post
‘दृष्टी’दोष दूर करणारे ‘कांताई नेत्रालय’(‘Kantai Netralaya’ which removes ‘vision’ defects)

'दृष्टी’दोष दूर करणारे 'कांताई नेत्रालय’('Kantai Netralaya' which removes 'vision' defects)

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo