Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मार्च व एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मार्च व एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश

रिडींग उपलब्ध नसलेल्या घरगुतीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सरासरी विजबिलाची आकारणी
वीजग्राहकांना स्वतः मीटरचे रीडिंग पाठविण्याचे आवाहन

नागपूर, दि.१३ एप्रिल २०२० : महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. सोबतच महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींगचे वीजबिल प्राप्त होईल.

डॉ राऊत यांच्या सूचनेप्रमाणे महावितरणने मार्च महिन्याचे बिल भरण्यास दि. १५ मे २०२० तर एप्रिल-२०२० चे वीजबिल भरण्यासाठी दि. ३१ मे २०२० ची अंतिम तारीख दिली आहे. यामुळे लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या  वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे  महावितरणकडून २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे. सोबतच वीजबिलांची छपाई व वितरण देखील बंद करण्यात आले आहे. तसेच वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. तथापि, महावितरणच्या कन्झुमर पोर्टलवरून किंवा मोबाईल एपमधील लॉगीनद्वारे वीजग्राहकांना मीटरचे रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे असा ‘एसएमएस’ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या राज्यातील २ कोटी १० लाखांपेक्षा अधिक वीजग्राहकांना पाठविण्यात येत आहे.

वीजग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन पाठविल्यास त्यांना प्रत्यक्ष वापरानुसार वीजबिल देणे शक्य होणार आहे. तसेच जे ग्राहक स्वत:चे मीटर रीडिंग पाठविणार नाही, त्यांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येईल. पुढील कालावधीत महावितरणकडून प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर या ग्राहकांना अचूक वीजबिल आकारण्यात येईल व मागील सरासरी वीजबिलांचे समायोजन करण्यात येणार आहे.
‘लॉकडाऊन’मुळे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट व मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सानुग्रह मदतीसह विनव्याजी कर्ज द्या; धोबी समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post

जामनेरमध्ये गुरुदेव सेवाश्रमचे बापूजी श्यामचैतन्य महाराज यांनी केले”मास्क”वाटप

Next Post
जामनेरमध्ये गुरुदेव सेवाश्रमचे बापूजी श्यामचैतन्य महाराज यांनी केले”मास्क”वाटप

जामनेरमध्ये गुरुदेव सेवाश्रमचे बापूजी श्यामचैतन्य महाराज यांनी केले”मास्क”वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo