Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मावशीत दिसली आई….वृषाली तिला व्हीलचेअर भेट देई…. असाही जोपासला माणूसकी धर्म; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील घटना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मावशीत दिसली आई….वृषाली तिला व्हीलचेअर भेट देई…. असाही जोपासला माणूसकी धर्म; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील घटना

जळगाव – ऐन तारुण्यात येतांना जी जवळची मैत्रिण असते ती आई.. ती आईच हिरावली गेल्याने दु:खी झालेल्या त्या युवतीला एका शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले.. आणि चमत्कार बाजूच्या बेडवर आपल्या आईच्या वयाची एक गरिब स्त्री दिसली…आपली आई म्हणून तिला डोळेभरुन पाहिले आणि आणखी दु:ख झाले…. तिला चालता येत नव्हते कारण दोन्ही पाय नव्हते… रक्‍ताची वा नात्याची नसली तरी ही आपली मावशी नक्‍कीच होऊ शकते…. जे आईसाठी करायचे होते तेच व्हिलचेअर भेट देत मावशीसाठी करु या… असा तिने संकल्प केला आणि डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात फॉलोअपसाठी येतांना वृषालीने आपल्या आईची आठवण असलेली व्हिलचेअर त्या मावशीला देऊन संकल्प पुर्ण केला … माणुसकी जोपासली…


आजच्या मतलबी आणि स्वार्थी जिवनात माणूस स्वत:शिवाय इतरांचा विचार करत नाही. पण कोविडने ही परिस्थीती बदलली आहे. अजूनही माणूसकी जिवंत असल्याचा प्रत्यय वेगवेगळ्या घटनांमधून दिसून येतो. असेच माय मरो आणि मावशी जगो.. अशी म्हण सहजच बोलली जाते मात्र या म्हणीला काहीशी साजेल अशी घटना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात घडली. एका युवतीने आपल्या आईसाठी घेतलेली व्हीलचेअर आईच्या स्मरणार्थ हातमजूरी करणार्या एका गरजू दोन्ही पाय गेलेल्या महिलेला मावशी म्हणत सप्रेम भेट दिली.


बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथील वृषाली राजाराम झुंबाले (वय २०) ह्या युवतीच्या आईला महिनाभरापूर्वी पॅरालिसीस झाला होता, तिच्यासाठी म्हणून वडिलांसह वृषालीने नवीन व्हिलचेअर विकत घेतली मात्र काही दिवसातच आईचे छत्र हरपले, वृषालीने कसेबसे स्वत:ला सावरले तोच तिला किडनी स्टोनचा त्रास उमळला. वडिल राजाराम झुंबाळे हे तात्काळ वृषालीला घेवून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आले. येथे तज्ञ डॉक्टरांनी तपासल्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया केली.

यानंतर शस्त्रक्रिया वॉर्डात वृषालीला पुढील उपचारार्थ दाखल केले, याप्रसंगी वॉर्डात एक ४० वर्षीय महिला रुग्ण देखील दाखल झाली. तिचे दोन्ही पाय कापावे लागले होते, मोलमजूरी करणारे कुटुंब आणि त्यातच आता दोन्ही पाय गेले. हे पाहून वृषालीला खुप वाईट वाटले. घरात आपल्या आईसाठी घेतलेली व्हिलचेअर तिच्या दृष्टीसमोर आली आणि त्या रूग्णांच्या रूपात मावशी दिसली यातूनच माणुसकीच्या नात्यातून पुष्पा कश्यप नामक चाळीसवर्षीय रुग्ण महिलेला आईच्या जागी मानत महागडी व्हीलचेअर भेट देण्याचे ठरविले. दरम्यान वृषालीचा डिस्चार्ज होऊन सात दिवसानंतर फॉलोअपसाठी रुग्णालयात आली होती, त्यावेळी तिने आठवणीने व्हीलचेअर सोबत आणली आणि त्या मावशींना सप्रेम भेट दिली. तिच्या या कृतीतून समाजासाठी माय मरो मावशी जगो.. चा आदर्श निर्माण केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण

Next Post

सोशल मीडिया फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हेच-वैशाली पाटील, जळगाव

Next Post

सोशल मीडिया फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हेच-वैशाली पाटील, जळगाव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo