Monday, April 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे;मीनल करनवाल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/09/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
“मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे;मीनल करनवाल

“मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे — शेंदुर्णीत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी व मार्गदर्शन”

सेवापंधरवडा अंतर्गत भारताचे प्रंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जल्म दिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महिलांचे सशक्तीकरण करणे व त्यांना उत्तम प्रकारे आरोग्य सेवा देणे या उद्देशाने “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत आज शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छता याविषयी मागदर्शन करण्यात आले.तसेच किशोर वयीन मुलींना मान्यवरांच्या हस्ते सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प.सदस्य संजयदादा गरुड तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद जळगांव च्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, मुख्याधिकारी शेंदुर्णी नगर परिषद विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशन चे राज्य उपाध्यक्ष डॉ आशिष महाजन,गोदावरी मेडिकल कॉलेज चे डॉ.जतिन बाविस्कर,ज्येष्ठ नेते गोविंद शेठ अग्रवाल,यू.यू.पाटील, सागरमाल जैन,दीपक गरुड,उत्तम थोरात,प्रकाश झंवर,सुवामन फासे,युवा नेते स्नेहदीप गरुड उपस्थित होते.
“मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे सर्व मुली व महिलांनी मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे मासिक पाळी लाज नसून अभिमान बाळगावा व स्री ने स्वतःला व स्वतःच्या आरोग्याचा विचार प्रथम करावा असे मनोगतात मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहितकुमार जोहरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.जे.पाटील यांनी केले.

महिला आरोग्य अधिकारी डॉ.पल्लवी राऊत यांनी उपस्थित किशोर वयीन मुलींना मासिक पाळीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.आदित्य पाटील,डॉ.श्रद्धा पाटील,गजानन माळी,राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील,अनुरथ रहाडे,योगेश पाटील , सुधाकर माळी, संयम हिवाळे,दीपक मोरे,ईश्वर कोळी,मंजू जवळे,रेखा इंगळे,विजय बेलदार,यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राजनंदिनी संस्थेतर्फे दिनेश पाटील यांना “राज्यस्तरीय समाजभूषण” पुरस्कार प्रदान

Next Post

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट – अनिल जैन

Next Post
जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट – अनिल जैन

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट - अनिल जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सामाजिक समता सप्ताहानिमित्त जात वैधता विशेष मोहिम

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सामाजिक समता सप्ताहानिमित्त जात वैधता विशेष मोहिम

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d