Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मासु कडुन न्यू हायस्कूल महाविद्यालयात जनरल सेक्रेटरी (GS) पदावर कु.तुषार शिंदे ह्यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
मासु कडुन न्यू हायस्कूल महाविद्यालयात जनरल सेक्रेटरी (GS) पदावर कु.तुषार शिंदे ह्यांची नियुक्ती

महाराष्ट्रभर विद्यापीठ अध्यक्ष व महाविद्यालयीन GS पदावर नियुक्त्या मासु येणाऱ्या काळात करणार;मासु अध्यक्ष ॲड.सिद्धार्थ सो. इंगळे

कल्याण – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या अराजकीय विद्यार्थी संघटनने न्यू हायस्कूल महाविद्यालय, कल्याण येथे आपल्या युनियनच्या महाविद्यालयीन जनरल सेक्रेटरी (GS) पदावर कु.तुषार शिंदे ह्यांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन सातत्याने राज्य सरकारकडे विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका आयोजित करण्याची मागणी करत आलेली आहे.

मासुच्या मते गेल्या ३० वर्षांपासून ह्या निवडणुका जाणीवपूर्वक बंद करून सर्वसामान्य गोरगरीब, कामगार,कष्टकरी,आदिवासी, मागासवर्गीय तरुणांना सामाजिक व राजकीय व्यवस्थेतुन हद्दपार करण्याचे कुटील डाव आखलेला आहे त्यामुळे या तरुणांना संधी मिळणे बंद झाले असून, सार्वजनिक विद्यापीठाचा व विद्यार्थी विकास सुद्धा खुंटलेला आहे त्यासाठी मासुने महाविद्यालयीन जनरल सेक्रेटरीपदी कु. तुषार शिंदे याची नियुक्ती करून या परिवर्तनाला सुरुवात केली आहे. ह्या सोहळ्याला स्थानिक विद्यार्थ्यांना उदंड प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्रभर विद्यापीठ अध्यक्ष व महाविद्यालयीन GS पदावर नियुक्त्या मासु येणाऱ्या काळात करणार आहे. महाराष्ट्रातील तरुण नेतृत्वाला वाव मिळवून देण्यासाठी, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा मंच तयार करण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये सामाजिक भावनेतून राजकीय कार्य करण्याची जिद्द व महत्वकांक्षा आहे त्यांनी आम्हाला संपर्क करावा असेही आवाहन यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना करण्यात आले.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.सिद्धार्थजी इंगळे ह्या सोहळ्यासाठी युवकांना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी आले असता त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व आपल्या हक्क अधिकारासाठी लढण्याची इच्छा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले तसेच मासुचे कार्याध्यक्ष ॲड.सुनील देवरे व उपाध्यक्ष ॲड.प्रशांत आशा वसंत जाधव, कल्याण डोंबिवली तालुका अध्यक्ष रोहित मस्के सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते.

तसेच कल्याण डोंबिवली तालुक्याचे इतर पदाधिकारी आकाश हिवाळे, संगम जाधव, सिद्धू निकम, चिराग, मधू आठवले, माधुरी शिंदे, आनंद शिंदे,अण्णासाहेब कांबळे उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राज्यपाल कोशारी यांचा निषेध

Next Post

जन्मदात्यांची संपत्ती बळकावून आईला सोडले वाऱ्यावर

Next Post
जन्मदात्यांची संपत्ती बळकावून आईला सोडले वाऱ्यावर

जन्मदात्यांची संपत्ती बळकावून आईला सोडले वाऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo