Thursday, January 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माहिती अधिकार कार्यकर्ते यांचा राळेगणसिद्धी येथुन मा.आण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार विरुद्ध एल्गार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2019
in माहितीचा अधिकार २००५, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
माहिती अधिकार कार्यकर्ते यांचा राळेगणसिद्धी येथुन मा.आण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार विरुद्ध एल्गार

अहमदनगर-(प्रतिनिधी) – रविवारी दि. २१ जुलै २०१९ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व असंघटित माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा राळेगणसिद्धी येथे मा. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माहिती अधिकार कार्यकर्ते हे माहिती अधिकाराची जन्मभूमी असलेल्या राळेगणसिद्धी येथे एकत्र झाले या मेळाव्याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या समस्या व विविध विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले गेले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माहिती अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री सुभाष बसवेकर सर, जितेंद्र विंचू, श्री शेखर कोलते माहिती अधिकार महासंघ नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष, माहिती सेवा समिती अध्यक्ष वरगुडे सर पुणे, श्री.राहुल प्रकाश कदम माहिती अधिकार महासंघ अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ,श्री. अजय तुम्मे सावली जिल्हा चंद्रपूर, श्री सोपान पवार माहिती अधिकार महासंघ विभाग प्रमुख मराठवाडा हे ही उपस्थित होते.


सदर कार्यक्रम स्थळी विविध विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले सर्वप्रथम माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे संघटन बांधणी कशी करावी याविषयी नाशिक येथील जितेंद्र विंचू सर यांनी सबंध महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मा. शेखर कोलते सर यांनी माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज यांचा वापर कसा करावा याची स्टेप बाय स्टेप माहिती कार्यकर्त्यांना दिली व सदर माहिती मिळत असताना कार्यकर्त्यांची अडवणूक कशा प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांकडून केली जाते व वारंवार अपील करून ही माहिती मिळत नाही त्यावर कार्यकर्त्यांनी न्यायालयीन लढा कसा करावा याविषयी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले.
मा. अजय तुम्मे सर यांनी माहिती आयुक्त कशा प्रकारे भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचे काम करतात आणि जनतेला अडवतात माहिती अधिकारात येणाऱ्या अपिलांवर ती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई न करता थातूरमातूर उत्तर दिले जातात याविषयी माहिती दिली आणि आयुक्त यांच्या वरती कारवाई करण्यासाठी कोणकोणते प्रकारची पावले उचलणे गरजेचे आहेत याविषयी सखोल माहिती दिली त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांवर होणार हल्ले व 353 सारखी कलमे चुकीच्या पद्धतीने वापर करुन मनमानी करणारे अधिकारीं पारदर्शकता आननारे कार्यकर्ते याच्यावर दबावतंत्र निर्माण करण्याचे कार्य होत आहे.
अश्या चुकीच्या निर्णया मुळे मानसिक तनाव वाढवनारे कलम यावर दुरुस्ती करने आणि राज्य माहिती आयुक्त यांच्या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी CCTV बसविने नियमानुसार दंड, शास्ती व नुकसान भरपाई देने,ही मागणी घेवुन RTI कार्यकर्ते राज्यपाल यांना निवेदन देवुन लवकरात लवकर यावर निर्णय न घेतल्यास सेप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपोषण करण्याचा इशारा अजय तुम्मे यानी दिला।
श्री. शिवाजी खेडेकर माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी कशी करावी माहिती अधिकार अर्जातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण कशा प्रकारे करावे व त्यातून भ्रष्टाचार कशाप्रकारे उघड करावा त्याच पद्धतीने माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात कसा पोहोचवला जाईल याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


माहिती अधिकार कायद्यात काम करत असताना माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एक व्यापक आणि मजबूत संघटन निर्माण करावे असे मत यावेळी अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. कारण जनते जर ठरवले की कोणतेही सरकार हे झुकवता येते कारण जनता जर जागृत असेल तर सरकार फक्त एकाच गोष्टीला घाबरते ते म्हणजे सरकार पडण्याला आणि जागरूक नागरिकांनी याच गोष्टीचा फायदा घेऊन सरकारला आपल्या मनासारखे वागायला आणि कायदे करायला भाग पाडला पाहिजे हे मत अण्णांनी अधोरेखित केले.
माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा आयोजक व सूत्रसंचालक राहुल कदम यांनी सदर कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून राहुल अवचट, अजय तुम्मे, शिवाजी खेडेकर, राजेंद्र निंबाळकर, राळेगणसिद्धी येथील कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.

माहितीचा अधिकार, लोकायुक्त आणि लोकपाल हे ब्रम्हास्त्र
शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आनने , भ्रस्टाचार नष्ट करने, गरीब पीड़ित जनतेला न्याय मिळणे साठी माहितीचा अधिकार सोबतच लोकायुक्त आणि लोकपाल कायदा सुद्धा ब्रम्हास्त्र ठरणार आहे . कार्यकर्त्यांनी या तिन्ही कायद्याच्या योग्य आणि कायदेशीर वापर करावा. कायदा वरच लोकतंत्र टिकून आहे . कार्यकर्त्यांनी संघटित होवून लढ़ा दिला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक कार्यात माझा प्रत्यक्ष सहभाग आणि पाठिंबा नेहमीच राहिल.
अन्नाजी हजारे
जेष्ठ समाजसेवक

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एन मुक्टो स्थानिक शाखा अध्यक्ष पदी डॉ. कल्पना भारंबे

Next Post

लाच स्वीकारताना कराड भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला अटक

Next Post
लाच स्वीकारताना कराड भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला अटक

लाच स्वीकारताना कराड भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला अटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d