Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस मुसळधार ; रेल्वे वाहतुकीवर परिणाम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई ;- मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या चोवीस तासांपासून मुंबईत चांगलाच पाऊस कोसळतो आहे. मुंबईशिवाय, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणीही मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाचा रेल्वेच्या तिन्ही सेवांवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा २० मिनिटे उशिराने सुरु आहे. हार्बर मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने सुरु आहेत. ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकलसेवा ५ ते १० मिनिटे उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही ५ मिनिटे उशिराने सुरु आहे.

मध्य रेल्वेची बदलापूर ते कर्जत ही लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. या मार्गावर झालेला बिघाड दुरुस्त केल्यानंतर ही सेवा पूर्ववत होईल. तसेच काही वेळापूर्वी बदलापूर ते कल्याण ही लोकलसेवाही पुढील सुचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकात त्यासंदर्भातली घोषणा करण्यात येत होती. सायन आणि कुर्ला या दोन स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईत झालेल्या पावसाचा विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. विमानांची उड्डाणं ३० मिनिटे उशिराने सुरु आहेत. एवढंच नाही तर मुंबईतल्या सखल भागांमध्येही पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. गांधी मार्केट भागात पावसामुळे पाणी साठू लागले आहे तर इतर सखल भागांमध्येही पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.  शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या २६ जुलैच्या पावसाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कल्याण शीळफाटा भागात पाणी साठले आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसर, दावडी या ठिकाणीही पाणी साठले आहे.

मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वेही बंद करण्यात आला आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मागील तासाभरात दादरमध्ये २० मिमी, अंधेरीत ३६ मिमी, कुर्ला या ठिकाणी २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधी २ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला होता. त्यादिवशी मध्य रेल्वे १६ तास ठप्प होती. आता आजही ऑफिस गाठणाऱ्या चाकरमान्यांना उशिराचा फटका सहन करावा लागणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शकुंतला विद्यालय येथे चंद्रयान-२ विषयावर प्रक्षेपण व माहिती कार्यशाळा संपन्न

Next Post

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या ५०० प्रवाशांची सुखरूप सुटका

Next Post
महालक्ष्मी एक्सप्रेसच्या ५०० प्रवाशांची सुखरूप सुटका

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या ५०० प्रवाशांची सुखरूप सुटका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d