Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘इंडियन ब्रॉडकास्टर्स’समवेत बैठक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘इंडियन ब्रॉडकास्टर्स’समवेत बैठक

● सावधानता बाळगून निर्मितीविषयक कामेही सुरु करण्याचा विचार 

● चित्रनगरीत चित्रीकरण सुरु होऊ शकते का याची चाचपणी

मुंबई, दि. २२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून मुंबईत चित्रनगरीत चित्रीकरण सुरु होऊ शकते का याची चाचपणी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य सचिवांना सांगितले आहे. आज इंडियन ब्रॉडकास्टर्स  फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा केली. यावेळी रेड झोन्स मधील शहरे वगळून इतरत्र चित्रीकरण स्थळे उपलब्ध होतील का तसेच चित्रीकरणाबाबत आराखडा लगेच सादर केल्यास शासन त्यावर निर्णय घेईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

Maha Info Corona Website

या कॉन्फरन्समध्ये फाऊंडेशनचे अध्यक्ष एन पी सिंग, संचालक पुनीत गोयंका, जे डी मजिठीया, नितीन वैद्य, एकता कपूर पुनीत मिश्रा, राहुल जोशी, आदेश बांदेकर, अभिषेक रेगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.संजय मुखर्जी सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असले तरी चिंतेचे कारण नाही. शासन पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. वेळेवर लॉकडाऊन केल्यामुळे व पुरेशी काळजी घेतल्याने आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या अंदाज  करण्यात आला होता त्या तुलनेत खूप वाढलेली नाही. दूरचित्रवाणी वाहिन्या आणि त्यावरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्री घराघरात पोहोचली आहे. या लॉकडाऊनमुळे त्यांना फटका बसला आहे परंतु सर्व काही थांबून राहावे या मताचा मी नाही. आपण यापूर्वीच रेड झोन वगळून इतरत्र मर्यादित प्रमाणात का होईना व्यवहार सुरु केले आहे. आता आपण झोनपेक्षा कंटेनमेंट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांचीही व्याप्ती कमी केली आहे. आपण कालच मराठी निर्माते, कलाकार यांच्यासमवेत विस्तृत चर्चा केली असून त्यांच्याही मागणीप्रमाणे पोस्ट प्रॉडक्शनची कामे किंवा शहरांबाहेर मर्यादित प्रमाणात चित्रीकरण करता येईल का याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इंडियन ब्रॉडकास्टर्स  फाऊंडेशनने सध्याच्या परिस्थितीत चित्रिकरणाबाबत आपण सावधानता बाळगून काय करू शकतो याचा आराखडा द्यावा, तो सांस्कृतिक कार्य विभागाकडून तपासून त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

टीव्ही उद्योग हा मनोरंजन क्षेत्राचा फार मोठा भाग असून अनेकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. हा उद्योग इथे स्थिरावला आहे आणि तो राज्यातच अधिक मजबूत व्हावा म्हणून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले.        

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पक्ष्यांसाठी जलपात्र बसविण्याचा उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Next Post

पुणे ‘स्मार्ट सिटी वॉर रुम’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Next Post
पुणे ‘स्मार्ट सिटी वॉर रुम’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

पुणे ‘स्मार्ट सिटी वॉर रुम’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo