Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

जळगाव ग्रामीणसाठी सर्वांगीण विकासाचा गुलाबराव पाटील यांचा दृढ संकल्प !

जळगाव /धरणगाव – (प्रतिनिधी) – शिवसेना नेते व महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि स्वतंत्र विकासाचा वचननामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित केला आहे. या वचननाम्यात मागील वेळेस दिलेल्या वचनांपेक्षा अधिक कार्य केले असून याही वेळेस मोठे प्रकल्पांवर भर देवून शेती रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची कटिबद्धता आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मांडण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विकासासाठी घेतलेल्या संकल्पाचे कौतुक केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीणचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर गुलाबराव पाटील यांनी सांगितले की “धनुष्यबाणावर विश्वास दाखवून संधी द्या. हा वचननामा फक्त आश्वासन नाही, तर विकासाचा दृढ संकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.*

शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष योजना आखण्यात आली असून शेती रस्त्यांचे डांबरीकरण, सौर ऊर्जा प्रकल्पाला गती देऊन त्यांना आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी शेतीसाठी सलग वीजपुरवठा, , गरजू शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना चालूच ठेवून महिला सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य देत बचत गट भवन उभारणी, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन यासारख्या योजना राबवल्या जाणार आहेत. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी टेक्स्टाईल पार्क, सहकारी सूत गिरणी, आणि विविध प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, शिक्षण क्षेत्रात डिजिटल शाळांचे रुपांतर आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांची स्थापना करून विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा पुरविण्याचा संकल्प वचननाम्यात करण्यात आला आहे.

प्रमुख विकास प्रकल्प
शेती रस्ते डांबरीकरणाला प्राध्यान्य, आसोदा – भादली परिसरात यशस्वी झालेली बंदिस्त पाईपलाईन योजना धरणगाव तालूक्यातही राबविणार, सुरु असलेल्या बालकवी ठोंबरे आणि बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकांना गती, धरणगाव रिंगरोड आणि पाळधी उड्डाणपूल, सर्व सुविधायुक्त बसस्थानकांची निर्मिती, मोठ्या पाझर तलाव निर्मिती आणि सिंचन प्रकल्पांचा विकास व शिरसोली परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प व सुतगिरणीचाही समावेश आहे. बचत गट भवन उभारणी, उर्वरित ग्रामपंचायत कार्यालय इमारती, धरणगाव येथे बाळासाहेब ठाकरे उद्यानचा समावेश आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लाडक्या भाचींचा हट्ट पुरविताना राजूमामांची दमछाक, प्रचारात घेतला वेग

Next Post

“आमच्याकडे रावेर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची संपूर्ण ब्लू प्रिंट तयार आहे” – अमोल जावळे

Next Post
“आमच्याकडे रावेर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची संपूर्ण ब्लू प्रिंट तयार आहे” – अमोल जावळे

"आमच्याकडे रावेर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची संपूर्ण ब्लू प्रिंट तयार आहे" - अमोल जावळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo