Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्री वयोश्री योजना” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान आरोग्य तपासणी शिबीर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्री वयोश्री योजना” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान आरोग्य तपासणी शिबीर

 

जळगाव दि. 21 ( जिमाका )”मुख्यमंत्री वयोश्री योजना” अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी जळगांव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक यांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान करण्यांत आलेले आहे तरी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
महापालिका क्षेत्रासाठी :- अधिष्ठाता, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, जळगाव,

जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव, राजश्री छत्रपती शाहु महाराज रुग्णालय, शाहुनगर जळगाव येथे 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान तपासणी होणार आहे.
ग्रामीण क्षेत्रासाठी :- जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, तसेच वैद्यकीयअधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव येथे 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान तपासणी होणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना नेमकी काय आहे?
राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय साधने/उपकरणे खदेरी करण्याकरिता तसेच मानसिक स्वास्थ्य केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना रावविण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास मान्यता देण्यांत आली आहे.

 

योजनेचे स्वरूप- या योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/दुर्बलतेनुसार सहायभूत साधने/उपकरणे खेरेदी करता येतील. (उदा श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ.)

योजनेचा लाभ घ्यावयासाठी आवश्यक कागदपत्रे १. आधारकार्ड/मतदान कार्ड, २. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, ३. पासपोर्ट आकाराचे २ फोटो, ३. दोन प्रकारचे स्वयंघोषणा पत्र (उत्पंन्ना बाबत व दुबार लाभ),४. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जळगांव जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक यांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन खालील प्रमाणे करण्यांत आलेले आहे तरी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यांत येत आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर

Next Post

जळगाव जिल्ह्यात प्रहार लढवणार विधानसभा निवडणूक

Next Post
जळगाव जिल्ह्यात प्रहार लढवणार विधानसभा निवडणूक

जळगाव जिल्ह्यात प्रहार लढवणार विधानसभा निवडणूक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d