जळगाव – (प्रतिनिधी) – येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी च्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष आणि मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील मधुकर पाटील यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न झाला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी तर प्रमुख अतिथी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के बी पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी प्राचार्य डॉ. अरुणाताई शिरिष चौधरी, संस्थेचे संचालक डॉ. विनय पाटील, संचालक चंदन अत्तरदे सेवापूर्ती सोहळ्याचे मानकरी श्री. सुनील पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्राचार्य डॉ. सुनिता पाटील, मधुस्नेह संस्था परिवाराचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्या सेवा प्रवासाची चित्रफित प्रदर्शित करून झाली. समारंभाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव डॉ. पी आर चौधरी यांनी १९९४ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचा प्रवासाची पार्श्वभूमी सांगताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जात आज संस्था नावारुपास आली आहे. परंतु संस्थेचा अधिक असा विकास घडवून आणण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असल्याचे सांगितले मान्यवरांच्या स्वागतानंतर सत्कारमूर्ती सुनील मधुकर पाटील यांचा संस्थेच्या वतीने माननीय कुलगुरू डॉ. के बी पाटील आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह साडी देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय तथा शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला प्रमुख अतिथीचे मनोगत व्यक्त करताना माजी कुलगुरू डॉ. के बी पाटील यांनी सांगितले की सुनील पाटील यांचा जीवन प्रवास पाहून एक प्रर्कषाने जाणवते की संस्थेच्या सेवेचा वारसा सेवेची परंपरा आणि प्रामाणिकपणा याच बाबींमुळे सुनील पाटील साहेबांसारखा कार्यकर्ता घडला शासकीय सेवेत राहून देखील माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून त्यांनी सत्कारमूर्तीचा गौरव केला दुसरे मनोगत व्यक्त करताना प्राचार्य राकेश चौधरी यांनी संस्थेचा विद्यार्थी ते प्राध्यापक ते प्राचार्य पदापर्यंतचा प्रवास करताना सुनील पाटील साहेब यांनी संपूर्ण व्यवस्थापन मंडळाने जी मोकळीक दिली मार्गदर्शन केले त्यामुळे येथील प्रत्येक कर्मचारी हा घडत गेला असे सांगितले श्री सुनील पाटील यांच्या सुविद्य पत्नी सुनीता पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना सुनीलजी म्हणजे एनर्जी सुनीलजी म्हणजे प्रचंड उत्साह सेवेला त्यांनी आयुष्यभर प्राधान्य दिले कुटुंबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या भावनेने त्यांनी काम केले परंतु सर्वांना न्याय देण्याचे काम देखील त्यांनी पार पडल्याचे सांगितले प्रमुख अतिथी आणि जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी आपल्या मनोगत प्रशासनातील अत्यंत प्रामाणिक तंत्रज्ञानाचा सदैव अवलंब करणारा अधिकारी म्हणून श्री सुनील पाटील यांचा गौरव केला तसेच सुनील पाटील यांच्या मधील सामाजिक समानशीलता हा गुण वाख्यनासारखा असल्याचे सांगितले सुनील पाटील यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना संपूर्ण ३६ वर्षाची सेवा ही सचोटी आणि कर्तव्यदक्ष राहुन कर्तव्यप्रती सजगता आणि सहकारी व कुटुंबांच्या आधाराने व सहकार्याने पूर्ण केले. यामध्ये माननीय जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर श्रीकांत सोनवणे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष शिरीषदादा यांनी सुनील पाटील यांच्या कामाचा वेग तत्परता हे गुण संस्था विकासासाठी मोठे मोलाचे ठरले असे सांगताना तंत्रज्ञान व संगणकाचे ज्ञान शेवटचा घटकापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करीत मातीशी नाळ कायम ठेवणारा असल्याचे सांगितले मुद्रांक अधिकारी रायगड अलिबाग श्रीकांत सोनवणे तसेच इतरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक डॉ. विनय पाटील यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला.











