जळगाव – (प्रतिनिधी) – शनिवार दिनांक 27/9/ 2025 रोजी,श्री.महालक्ष्मी मित्र मंडळ महाजन नगर,मेहरून तर्फे श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री.पी.ई. तात्या पाटील रुग्णालय जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमानाने, मेहरूण परिसरातील सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 नागरिकांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष श्री.अल्पेश भाऊ देवरे यांचा सहकार्याने नवरात्री महोत्सवा निमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल,डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ.अमिता श्रीवास्तव, नेत्रचिकित्सक श्री. जयेश वाल्हे, फिजिओथेरपी तज्ञ.अभिलाषा मुंदडा तसेच प्रशिक्षणार्थी प्राची खलसे,देवयानी चव्हाण, भावना दातीर, हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी, यांनी मेहरून परिसर, रामेश्वर कॉलनी, महाजन नगर, रुग्णांची तपासणी केली. कार्यक्रमाला श्री.मुकेश भाऊ नाईक, श्री.नवल परदेसी,श्री.आकाश सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

यामध्ये “नमो नेत्र संजीवनी स्वास्थ अभियाना अंतर्गत,” १९ गरीब व गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर,प्राचार्य. डॉ.सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक श्री. डॉ.नरेंद्र शर्मा,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.











