मुंबई(प्रतिनिधी)- दररोज सीएसएमटीच्या दिशेने हजारो प्रवाशांना सुखरूप घेऊन येणाऱ्या आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या राहत्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या लोकल ट्रेनचे मोटरमन दिलीप सिंग यांच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे ऑफिसला वेळ होत असतानाही अनेक मुंबईकर त्यांच्याजवळ थांबून, त्यांना मिठी मारून, त्यांना शुभेच्छा देत त्यांचा निरोप घेत होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील वातावरण आज भाऊक झालं होतं.
फुलांनी सजविलेली लोकल ट्रेन, त्यात काळा कोट आणि डोक्याला रुमाल बांधून त्याच उत्साहात लोकलट्रेन चालवणारे दिलीप सिंग आज सीएसएमटी स्थानकावर पोहोचले आणि लोकलमधून उतरलेल्या प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत त्यांना हारतुरे घातले तर अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.










