Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यशोधन इमारतीत फक्त चौथा मजला सीलबंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

चर्चगेट परिसरातील दिनशॉ वाच्छा मार्गावरील यशोधन इमारतीत कोविड १९ बाधित रुग्ण आढळल्यामुळे, या इमारतीतील फक्त चौथा मजला प्रतिबंधित (सील) करण्यात आला आहे. संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात आलेली नाही.

कोविड १९ संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करताना सुधारित पुनर्रचनेनुसार, प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन’ व्यतिरिक्त ‘सीलबंद इमारती’ ही आणखी एक वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण (asymptomatic) आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येते. तसे करताना, बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण रहात असलेल्या सदनिकेची व इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित इमारत किंवा इमारतीचा काही भाग ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येतो.

याच निर्देशांच्या आधारे संपूर्ण यशोधन इमारत नव्हे तर या इमारतीतील फक्त चौथा मजला प्रतिबंधित/ सीलबंद करण्यात आला आहे.

अशा प्रकरणांमध्ये, इमारतीच्या / सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीस माहिती दिली जाते. त्याचबरोबर सोसायटीतील इतर व्यक्तींना बाधा होऊ नये, यासाठी राबवावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात येते. या सर्व निर्देशांचे पालन करण्यात येत आहे.

प्रसारमाध्यमांकडून होत असलेल्या विचारणेच्या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदिवासी लोकांना मोहाच्या सरपंचाकडून स्वखर्चातून मोफत ५०० मास्क चे वाटप , डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला, आशा आणि महिला बचत गटाकडून मास्क चे मोफत शिवण काम

Next Post

अर्सेनिक अल्बम-30 औषधाची किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई होणार – गोरक्ष गाडीलकर

Next Post
अर्सेनिक अल्बम-30 औषधाची किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई होणार – गोरक्ष गाडीलकर

अर्सेनिक अल्बम-30 औषधाची किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई होणार - गोरक्ष गाडीलकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo