Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युतीची घोषणा कधीही होऊ शकते: मुख्यमंत्री

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

बीड – लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजप शिवसेना युती झाली हे माध्यमांना कळले नाही. युती होईल की नाही याची चर्चा होत असताना ही घोषणा आम्ही केली. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा कधी होईल ते कळणार ही नाही. एका दिवसात अचानक कधीही आम्ही युतीची घोषणा करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते भाजपच्या महाजनादेश यात्रेसाठी आले होते.  
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने महाजनादेश यात्रेचं प्रचंड स्वागत केलं, पण याविरोधात आपण विरोधकांच्या यात्रेची परिस्थिती निश्चितपणे बघू शकता. लोकांचा प्रतिसाद राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या यात्रेला मिळत नाही. काँग्रेसला यात्रा देखील मंगल कार्यालयात सुरू करावी लागते. राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा, तर सुप्रिया सुळे यांनी दुसरी संवाद यात्रा काढली. सत्तेत असताना जनतेशी संवाद ठेवला नाही अन्यथा त्यांच्यावर ही परिस्थिती आली नसती. सत्तेत असताना त्यांनी केवळ स्वतःशी संवाद केला जनतेशी नाही. त्यामुळे जनतेने त्यांना या परिस्थितीमध्ये आणलं आहे. त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश होतो आहे. आमच्या या यात्रेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांमध्ये राज्य सरकारने केलेली विविध कामे जनतेपर्यंत आम्ही पोचवतो आहोत. 

‘यंदा मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा भीषण दुष्काळ समोर उभा आहे पुन्हा एकदा गतवर्षीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यांमध्ये त्याची दाहकता जास्त आहे. काही ठिकाणी पाऊस ठीक आहे पण पाऊस झाला नाही तर तिथे राहणे अवघड आहे. यासंदर्भात उपाययोजना आम्ही करणारच आहोत. पण महत्त्वाचं किती वर्ष मराठवाड्याने दुष्काळ सहन करावा आणि म्हणून दुष्काळावर शाश्वत उपाययोजना झाली पाहिजे या दृष्टीने दोन उपायोजना आम्ही करणार आहोत. मराठवाडयात महत्त्वाकांक्षी प्रकल्प वॉटरग्रिड राबवणार आहे . यामध्ये धरणांना एकमेकांशी जोडलं जाणार आहे व त्यातून पाणी गावापर्यंत पोचवण्यात शहरांपर्यंत पोचवलं जाणार आहे . आणि साधारणपणे वीस हजार कोटी रुपये या वॉटरग्रिडला लागतील असा अंदाज आहे .पहिल्या टप्प्यात १० हजार आठशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय .यामध्ये बीड जिल्ह्याच्या संपूर्ण आराखडा तयार असून १०७९ किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे व ४.८०० कोटी रुपयांच्या योजनेस मंत्रिमंडळ मान्यता दिली असल्याचे ते म्हणाले . आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी हे देखील उपलब्ध होईल .या बरोबर कोकणातील वाया जाणारे १६७टीएमसी पाणी मराठवाड्यात आणले जाणार आहे .हा महत्त्वाकांक्षी निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे इकडे कृष्णा मराठवाड्याचे पाणी मराठवाड्याला देण्याकरता कामाची सुरुवात केली आहे बोगद्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्यांना बीड जिल्ह्यामध्ये आष्टी पाटोदा भागाला फायदा होईल,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणातलं पाणी मराठवाड्यामध्ये आणायचं आणि त्यातून उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाडा कायमचा दुष्काळ मुक्त करायचा आहे .त्यातील २५टीएमसीचा डीपीआर तयार केल्यानंतर आम्ही तसं टेंडर लवकरच काढणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. या महाजनादेशच्या माध्यमातून लोकांचा जनादेश पुन्हा घेऊन त्याही पेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली . 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भीम आर्मी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Next Post

मोदी सरकार देशाला दिवाळखोरीत ढकलतंयः काँग्रेसचा आरोप

Next Post

मोदी सरकार देशाला दिवाळखोरीत ढकलतंयः काँग्रेसचा आरोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo