Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा उपक्रम; विजेत्या संघाला रोख पारितोषीके

Desk Team by Desk Team
20/08/2026
in विशेष
Reading Time: 1 min read
युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

जळगाव दि. १८ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिवतीर्थ मैदान येथे युवतींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. दहिहंडी फोडणाऱ्या युवतींच्या प्रथम विजेत्या संघाला ३११११ रूपये, द्वितीय संघाला २११११ रूपये, तृतीय संघाला १११११ रूपये रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. युवतींच्या दहीहंडीचे यंदा १८ वे वर्ष असून दहिहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहींहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनविणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी होत असते.
सदर दहीहंडी उत्सवाची समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्षपदी उषा जैन, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर व सचिवपदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे.

सदर कार्यकारीणी पुढीलप्रमाणे – खजिनदार निलम जोशी, स्वागत समिती सदस्य रूपाली वाघ, सदस्य म्हणून डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, नेहा जोशी, सोनाली पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, संध्या कांकरिया, मिनल जैन यांची या असतील. युवतींची दहिहंडी उत्सव समितीच्या नविन कार्यकारिणीने ‘ठेवूया संस्कृतीची जाण, वाढवू आपल्या उत्सवाची शान’ या टॅगलाईन चे पोस्टर अनावरण केले.

कोट..

‘युवतींनी युवतींसाठी आयोजित केलेली दहिहंडी हा अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम आहे. महिलांनी पुढाकार घेऊन महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करणे ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. त्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमामधून युवतींच्या आत्मविश्वाला बळ मिळते आणि समाजात महिला नेतृत्वाची नवी दिशा निर्माण होते.’
अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

Desk Team

Previous Post

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

Next Post

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

Next Post
फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo