Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

Desk Team by Desk Team
13/08/2026
in विशेष
*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*गांधी रिसर्च फाउंडेशन व वन विभाग यांच्या संयुक्त उपक्रम*

*जळगाव, दि. 12 (प्रतिनिधी)* : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गांधी रिसर्च फाउंडेशन, आणि जळगाव वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुभूती निवासी स्कुलच्या पाठीमागील राखीव वनातील कक्ष क्रमांक ४०७ येथे वृक्षारोपण व सीड्स बॉल लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध प्रजातींच्या ५०० रोपांची लागवड करण्यात आली. तसेच करंज, कांचन आदी वृक्षप्रजातींच्या ३ हजार सीड्स बॉलची पेरणी करण्यात आली. वनक्षेत्रातील जैवविविधता वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमास जैन इरिगेशन च्या गार्डन व कृषी विभागाचे प्रमुख अजय काळे, संजय सोनजे, पर्सोनल विभागाचे राजेश आगीवाल, जैन इरिगेशनच्या वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण व अमोल पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत कोळी, हरिष थोरात, स्वप्निल गोसावी व संभाजी पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर विक्रम अस्वार, डिव्हाईन गार्डन विभागाचे मयूर देशमुख, शुभम काळे, गोकुळ सपकाळे यांच्यासह चार स्थानिक महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मान्यवर, महिला बचत गटांच्या सदस्या व ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून वृक्षारोपण आणि सीड्स बॉल लागवडीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या उपक्रमामुळे राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता संवर्धनास हातभार लागणार असून, स्थानिक पातळीवर हरित महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ मिळणार आहे.

Desk Team

Previous Post

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

Next Post

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

Next Post
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo