Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजूमामा भोळेंनी तुकाराम वाडी, जानकी नगर, कासमवाडी भागात साधला संवाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
राजूमामा भोळेंनी तुकाराम वाडी, जानकी नगर, कासमवाडी भागात साधला संवाद

जनकल्याणाची कामे केल्याने पुन्हा एकदा विजयासाठी जुन्या गावात नागरिकांनी दिले शुभाशीर्वाद

जळगाव – (प्रतिनिधी) – महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यात तुकारामवाडी, जानकी नगर, गणेशवाडी मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे संवाद रॅली काढली. जळगावकरांकडून आमदार भोळे यांना भरभरून प्रेम मिळत आहे. रॅलीत ‘भारत माता कि जय’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा विविध घोषणा दिल्या जात असून या घोषणांनी शहर दणाणले आहे. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी शहरात जनकल्याणाची कामे अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला.

रॅलीमध्ये खा. स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, मंडळ क्रमांक ७ चे अध्यक्ष गोपाल पोपटानी, माजी नगरसेवक मंगला चौधरी, शिवसेनेचे माजी नगरसेवक कुंदन काळे, ॲड.शुचिता हाडा, मनोज आहुजा, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप रोटे, मंडळ सरचिटणीस विनय केसवानी, महेश पाटील, संदीप बाविस्कर, योगेश बागडे, हेमंत जोशी, प्रसन्न बागल, भूषण काकडे, विजय पाटील, दिनेश प्रजापत, सौरभ महाजन, सुशील जगताप, पंकज गागडे, नंदिनी दर्जी, कल्पना मावळे, उषा परदेशी, ज्ञानेश्वरी कांडेलकर, शिवसेनेचे पियुष कोल्हे, स्वप्नील परदेशी, उमेश सोनवणे, अमर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दही खाऊ घालत विजयासाठी दिले आशीर्वाद …
शनिवारी सायंकाळी पांडे डेअरी चौकातील रामदेव बाबा मंदिर येथे दर्शन घेऊन आ. भोळे यांनी भेटींना सुरुवात केली. तेथून तुकाराम वाडी, महादेव मंदिर परिसर, जानकी नगर, गणेशवाडी, मंजुषा हौसिंग सोसायटी, कासम वाडी मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान आ. भोळे यांनी महेश पाटील, शांताराम सूर्यवंशी, वृत्तपत्र विक्रेते विलास वाणी आदींच्या घरी भेटी दिल्या. तसेच, जानकी नगरात मोठे भाऊ अरुण भोळे यांनी त्यांना गोड दही खाऊ घालून विजयासाठी आशीर्वाद दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गावा – गावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट;१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष

Next Post

छत्रपती शिवाजीनगर परिसरातील ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी भारावले आमदार राजूमामा, प्रचारात आघाडी…

Next Post
छत्रपती शिवाजीनगर परिसरातील ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी भारावले आमदार राजूमामा, प्रचारात आघाडी…

छत्रपती शिवाजीनगर परिसरातील ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी भारावले आमदार राजूमामा, प्रचारात आघाडी...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo