Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रुग्णालय ‘नॉन कोविड’ झाल्याने रक्तदानासाठी नागिरकांनी पुढे यावे-अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
रुग्णालय ‘नॉन कोविड’ झाल्याने रक्तदानासाठी नागिरकांनी पुढे यावे-अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रतिपादन

जळगाव : कोरोनाकाळात रक्ताची भासलेली गरज पाहता ज्या संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला आणि अनेकांचे प्राण वाचविले अशांना मनापासून सलाम आहे. रक्तदान हि काळाची गरज आहे. आजपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ‘नॉन कोविड’ झाले असून रुग्णालयाच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे कोरोनाकाळात रक्तदान शिबीर आयोजित केलेल्या आयोजकांना गुरुवारी दि. २२ जुलै रोजी सन्मानित करण्यात आले. त्यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर प्रवीण धिमन, पोलीस मुख्यालयाचे आरपीआय संतोष सोनवणे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड, परिवहन कार्यालयाचे चंद्रकांत इंगळे, विकृतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. भारत घोडके, अधिसेविका प्रणिता गायकवाड मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीला दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी उदघाटन केले. त्यानंतर रक्तपेढीविषयी माहिती आणि कोरोनाकाळात करण्यात आलेले रक्तसंकलन याविषयी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. उमेश कोल्हे यांनी प्रस्तावनेत माहिती दिली. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. रामानंद म्हणाले की, समाजातील शेवटचा गोरगरीब घटक आहे, त्याला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी हे रुग्णालय आशादायी असते. त्यासाठी रक्तदान शिबीरच्या माध्यमातून केलेले रक्तदान हे गोरगरिबांचा आशीर्वाद मिळवून देते असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन रोहिणी देवकर व एल.एन. त्रिपाठी यांनी तर आभार डॉ. आकाश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाकरिता निलेश पवार, भरत महाले, पंकज चौधरी आदींनी परिश्रम घेतले. नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी रक्तपेढीला भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची घेतली भेट

Next Post

स्पर्धा परीक्षा तयारीबाबत शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Next Post

स्पर्धा परीक्षा तयारीबाबत शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo