Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेल्वे प्रवासात झोप पडली महागात, तब्बल ‘इतक्या’ कोटींचं सोनं गायब…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/05/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
रेल्वे प्रवासात झोप पडली महागात, तब्बल ‘इतक्या’ कोटींचं सोनं गायब…

मुंबईहून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका सराफाला रेल्वे प्रवासातील साखरझोप बरीच महागात पडली. गोव्यातील काणकोण येथील क्रॉसिंगजवळ रेल्वे थांबली असता, अज्ञात चोरट्यांने त्यांची सोने असलेली बॅग पळविली.बॅगेत चार कोटी पंचवीस लाखांचे सुवर्णलंकार होते.

अशोक आर असे या सरफाचे नाव असून, तो मूळ केरळ राज्यातील असून, मुंबईतील पनवेल भागात तो रहात आहे.काणकोण येथील क्रॉसिंगवर रेल्वे थांबलेली असता पहाटे सुमारे तीनच्या दरम्यान चोरीची वरील घटना घडली. गुजरातहून केरळला जाणाऱ्या गांधीधाम हमसफर एक्स्प्रेसमधून अशोक आर प्रवास करीत होते. सोने असलेली बॅग खाली लॉक करून ते वरच्या बर्थवर झोपले होते.

पहाटे रूळ बदलण्यासाठी रेल्वे कानकोण क्रॉसिंगवर थांबली असता चोरट्याने बॅगला लावलेली साखळी कापून नंतर बॅग पळवली.ज्या जागेवर रेल्वे थांबली होती, तेथून काही अंतरावर फोडलेल्या अवस्थेत ती बॅग सापडली. खालच्या बर्थवर झोपलेल्या एका प्रवासाला कुणीतरी बॅग घेऊन जात असताना नजरेस पडला. त्याने नंतर अशोकला उठवले. बॅगची त्यांनी शोधाशोध घेतली.

मात्र, ती सापडली नाही. कानकोण येथे पाेहोचल्यानंतर अशोक आर यांनी या चाेरीप्रकरणी तेथील रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. या चोरी प्रकरणाचा तपास चालू असल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे उपअधिक्षक गुरुदास कदम यांनी दिली.

Team Satymev Jayate

Previous Post

DBT पोर्टलवर शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० मे पर्यंत मुदतवाढ

Next Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भगवान गौत्तम बुद्ध जयंती उत्साहात साजरी

Next Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भगवान गौत्तम बुद्ध जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo