Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीज व ज.जि.पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.पि.व्ही.माळीदादा स्मरणार्थ भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन-प्रवेश मोफत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीज व ज.जि.पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.पि.व्ही.माळीदादा स्मरणार्थ भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन-प्रवेश मोफत

जळगाव – (प्रतिनिधी) – क्रिडा प्रकारातील एक अतिशय महत्वाचा क्रिडाप्रकार म्हणजे जलतरण होय. या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गटीब,होतकरू आणि गुणी नलतरणपटूंना अटीव मदत करण्याच्या दृष्टीने येथील लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीजे व जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त सहकार्याने रविवार दि.17 एप्रिल 2022 रोजी स्व. पि. व्ही. माळीदादा स्मरणार्थ भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धा जळगाव पोलीस जलतरण तलाव, पोलीस मुख्यालय परिसर येथे सकाळी 11 ते 3 या वेळेत होणार आहेत.

स्व. पी. व्ही. माळीदादा यांनी जलतरण प्रकार तसेच विविध नामांकित जलतरणपटू घडविण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. सुमारे तीस-बत्तीस वर्षांपूर्वी जळगावात प्रोफेशनल स्विमिंग रुजविणारे ते जळगावातील पहिले प्रशिक्षक होय.

1994 साली जळगावात पहिल्यांदा माळीदादांच्या नेतृत्वात राज्य नामांकन जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जळगावातील मेहमण येथील कै. कोकीळगुळजी जलतरण उभारण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. या तलावासंदर्भातील सोयीसुविधा संदर्भातील बाबींसाठी त्यांनी माजीमहापौर प्रदीप रायसोनी यांच्या घरावर काढलेला स्विमिंग कॉस्च्युम मोर्चा हा ऐतिहासिक ठरला होता.

जळगावातील होतकठ क्रिडापटूंसाठी जैन इटिंगेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धासाठी त्यांनी वेळोवेळी मदतही उपलब्ध करून दिली.

जळगावातील होतकरु खेळाडूंसाठी प्रथमतः दत्तक योजनेचे संकल्पना त्यांनीच आणली. कमलेश नगरकर, राहूल रनाळकर,प्राची मोघे ,पियुष श्राफ, मिलिंद बाविस्कर यांसारखे असंख्य जलतरणपटू माळीदादांनी घडविले ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भरीव कामगिरीची चमक दाखविली. शिवाय माळीदादांनी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा संचालक म्हणून सुमारे 25 वर्षे त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली.

स्व.पि.व्ही.माळीदादांच्या जलतरण क्षेत्रातील या अनमोल योगदानामुळेच त्यांच्या पुण्य स्मरणार्थ दि.17 एप्रिल रोजी सदरील भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा 5 वेगवेगळ्या गटात घेतल्या जाणार असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.1) गट-1-(स्त्री व पुरुष)–फ्री स्टाईल-50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक–50 मी. 2) गट-2–(मुले व मुलीवय-15 ते 17 वर्षे) –फ्री स्टाईल-50 मी.ब्रेस्ट स्ट्रोक-50 मी. तसेच-फ्री स्टाईल मिक्स टिले 4 बाय 50 मी. 3) गट 3 (मुले व मुली वय- 12 ते 14 वर्षे) फ्री स्टाईल- -50 मी. बेस्ट स्टोक–50 मी. तसेच-फ्री स्टाईल मिक्स टिले 4 बाय 50 मी 4) गट–4(मुले व मुली वय–1ते 10 वर्षे) फ्री स्टाईल-50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक –50 मी. तसेच-फ्री स्टाईल मिक्स टिले 40 बाय 50 मी 5) गट-5 (9 वर्षाखालील मुले मुली ) फ्री स्टाईल- 25 मी. ब्रेस्ट स्ट्रोक–25 मी. तसेच-फ्री स्टाईल मिक्स रिले अशा विविध वयोगटात घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून प्रवेश पूर्णतः मोफत असणार आहे. सहभागी जलतरणपटूंना टी-शर्ट सर्टिफिकेट ब्रेकफास्ट व लंच इत्यादी मोफत दिले जाणार आहे. तर विजेत्यांना मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सदर पत्रकार परिषदेस पो. नि. आंबादास मोरे, कंपनीचे संचालक अनिल माळी, पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी व इतर सहकारी उपस्थित होते.

सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 22 एप्रिल हि अंतिम दिनांक अमूल स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती तसेच प्रवेशासाठी श्री. कमलेश नगरकर मो. क्र. 9423491808, व गायत्री येटपाल मो. क्र. 7397803577 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हर्षल पाटील ‘नेट – जेआरएफ’ परीक्षा उत्तीर्ण

Next Post

उन्हाळी परिक्षेकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावे- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo