Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लसीकरणास मुभा नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानंतर करावे -जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जिल्ह्यातील जे अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस घेण्यास वैद्यकीय कारणास्तव मुभा नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पात्र डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेवून नोव्हेंबर 2021 चे वेतन अदा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी जिल्हा कोशागार अधिकारी, जळगाव यांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे. किमान एक मात्रा घेतली असल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व सवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच माहे नोव्हेंबर 2021 (paid in माहे डिसेंबर2021 ) या महिन्यातील वेतन देयक अदा करावे. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा घेतलेली नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करू नये असे कळविण्यात आले होते.

तथापि, संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ लशीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यांनतर 14 दिवस झालेले आहेत, अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा ज्या व्यक्तीची वैद्यकिय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरांकडील प्रमाणपत्र आहे, अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा असल्याचे संदर्भिय आदेश 27 नोव्हेंबर 2021 मध्ये सूचित करण्यात आलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर माहे नोव्हेंबर 2021 या महिन्याचे वेतन देयक अदा करण्यासाठी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र घेवून माहे नोव्हेंबर -2021 चे वेतन देयक अदा करण्याची कार्यवाही करावी. तसे सर्व उपकोशागार अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

Next Post

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागाचे ‘महाबीज’च्या व्यवस्थापकांचे आवाहन

Next Post
सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागाचे ‘महाबीज’च्या व्यवस्थापकांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo