Saturday, July 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

मुंबई, दि. १२: कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.  राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जाणार नाही. ही ऑनलाईन ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळात उलप्ध असणार असून  रविवारी ही सेवा उपलब्ध नसणार आहे. मात्र टप्प्याटप्प्याने त्याची वेळ वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. नांदेड, भंडारा, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आला आहे. गेले काही दिवस प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली. आता मात्र राज्यभर सर्वत्र सेवा सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे ४०० हून अधिक रुग्णांना या सेवेमार्फत उपचार देण्यात आले आहेत. या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईल याचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो. थेट व्हीडीओ कॉन्फरन्सिंग, लिखीत संदेश याद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करता येईल.

कशी वापरता येईल सेवा:

१) नोंदणी करून टोकन घेणे- त्यासाठी मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी करत येईल. त्यावर त्यावर ‘ओटीपी’ आल्यानंतर त्या माध्यमातून रुग्णाने नोंदणी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर टोकनसाठी विनंती करायची. आजाराबाबत काही कागदपत्रे, रिपोर्ट असतील ते अपलोड करता येतील. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाचा ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होईल.

२) लॉगईन करण्यासाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येईल. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकच्या आधारे लॉगईन करता येईल.

३) वेटींग रुम- वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टीवेट) होईल. त्यानंतर व्हीडओ कॉल करता येईल.

४) तुम्हाला डॉक्टर स्क्रीनवर दिसतील. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर  लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक दुकाने सुरू झाल्याने नागरिकांची खरेदीसाठी रांग

Next Post

तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन होताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ !

Next Post
तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन होताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ !

तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन होताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo