Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची 711 कामे सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप


• सुरु असलेल्या कामांवर 4 हजार 19 मजुर उपस्थित
• सेक्युयर प्रणालीवर 2 हजार 405 कामांना देण्यात आली तांत्रिक व प्रशासकिय मंजुरी

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 24 – कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा. जिल्ह्यातील नागरीकांची उपासमार होवू नये, त्यांच्या हाताला काम मिळावे, याकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जळगांव डॉ अविनाश ढाकणे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर 1 एप्रिल, 2020 पासून अकुशल मजुरीचा दर 238 रुपये इतका करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात स्थानिक मजूरांना गावातच काम उपलब्ध व्हावे याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. जळगांव जिल्हयात आज रोजी 711 कामे सुरु असून 4019 मजुर उपस्थित आहेत. तसेच सेक्युयर प्रणालीवर 2405 कामांना ‍ तांत्रिक व प्रशासकिय मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सदर कामांपैकी जास्तीत जास्त कामे सुरु करुन ग्रामीण मजुरांना अधिकाधिक कामे उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ ढाकणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागातील मजुरांनी या कामांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
त्याचबरोबरकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही कामे करतांना मजुरांनी मास्कचा वापर करावा तसेच सामाजिक अंतर ठेवण्याची खबरदारी घेण्यात यावी. तसेच रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांना वारंवार हात धुण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून डेटॉल साबणाचे वितरण करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 हजार 889 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी करण्यात आले स्क्रिनिंग

Next Post

३२ कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

Next Post
जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

३२ कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo