Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊन मुळे गैरसोय होत असलेल्या रुग्णांसाठी धावून आले आ.मंगेश चव्हाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लॉकडाऊन मुळे गैरसोय होत असलेल्या रुग्णांसाठी धावून आले आ.मंगेश चव्हाण

मागील १५ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दररोज १५० चहा व बिस्कीट पुड्यांचे वाटप

चाळीसगाव – तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले चाळीसगाव शहर वैद्यकीय सोयी सुविधा यासाठी मेडिकल हब म्हणून आपली ओळख बनवत आहे. चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुका तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका येथील रुग्ण विविध उपचारासाठी चाळीसगाव शहरात येत असतात मात्र लॉकडाऊनमुळे मागील २ महिन्यांपासून हॉटेल व चहाच्या टपऱ्या बंद असल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना चहा – नाश्त्याची सोय होत नव्हती. बहुतांश रुग्णांना सकाळी चहा सोबत औषधी दिली जाते मात्र हॉटेल बंद असल्याने नाईलाजाने उपाशीपोटी रुग्णांना औषधी घ्यावी लागत होती. ही बाब आमदार मंगेश चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशन च्या मार्फत एडमीट असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना दररोज सकाळी चहा व पारले जी बिस्कीट पुडा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी डेअरी एरियातील विकास टी हाऊस चे संचालक विकास सपकाळ व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी मुन्ना उर्फ कुणाल तांबे यांना या सेवाकार्याची जबाबदारी देण्यात आली.मागील १५ दिवसांपासून दररोज शहरातील ७ ते ८ हॉस्पिटलमध्ये १४० ते १५० रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना न चुकता चहा व सोबत एक पारले जी बिस्कीट पुडा देखील दिला जातो.भल्या पहाटे सकाळी ७ वाजता चहा – बिस्कीट वाटपास सुरुवात होते ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहते. खऱ्या अर्थाने जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका घेत आमदार मंगेश चव्हाण हे लॉकडाऊन च्या काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेसाठी धावून आले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पालकमंत्र्यांनी साधला जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी संवाद जाणून घेतली सोयीसुविधांची माहिती

Next Post

रेडक्रॉस तर्फे पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिसांची प्राथमिक आरोग्य तपासणी

Next Post
रेडक्रॉस तर्फे पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिसांची प्राथमिक आरोग्य तपासणी

रेडक्रॉस तर्फे पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिसांची प्राथमिक आरोग्य तपासणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo