Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया – पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया – पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानतर्फे रामेश्वर काॕलनी परिसरात वृक्षारोपण


जळगाव दि. 9 प्रतिनिधी – शहरातील सामाजिक संस्था, उद्योजक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रहिवासी यांच्या लोकसहभागातुन शहरांमधील प्रत्येक ओसाड जागेवर वृक्षारोपण केले जावे. जेणे करून हरित शहर होण्यास मदत होईल, असे सांगत रामेश्वर काॕलनीतील नागरिकांचा उत्स्फूर्त लोकसहभागाचे कौतुक पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी केले व लोकसहभागातुन शहराला हरित शहर करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
रामेश्वर काॕलनीमधील हरेश्वरनगरातील हनुमान मंदिर परिसरातील अमृत पाणीपुरवठ्याच्या रेमंड काॕलनी जलकुंभच्या खुल्या भुखंडावर वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते.

जैन इरिगेशनच्या अनमोल सहकार्याने आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तपणे होत असलेल्या वृक्षारोपण सृजनशिल उपक्रमाप्रसंगी जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, सदस्य प्रो. सविता नंदनवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वक उदय महाजन, डाॕ. अश्विन झाला, सुधीर पाटील, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील अतिन त्यागी, अनिल जोशी, उद्योजक सुबोध चौधरी, राधेशाम मणियार, तांबापुरा फाऊंडेशनचे अध्यक्ष मतिन पटेल, अमन फाऊंडेशनचे शाहिद सय्यद यांच्यासह परिसरातील दिपक मांडोळे, संदीप मांडोळे, अनिल घुले, दिपक संनसे, विक्की कचरे, यशवंत सपकाळे, सुमित देशमुख यांच्यासह रहिवासी उपस्थितीत होते. मान्यवरांसह नागरिकांनी मिळुन 250 देशी जातीच्या वृक्षाच्या रोपांची लागवड केली. यामध्ये बेहडा, करंज, पिंपळ, बुच, रिटा, वड, चिंच, पेल्टोफाॕर्म, बकूळ, निंब, बेल, पारिजातक, कांचन, जांभूळ, पिंपळ बेंड, स्पॕथोलिया, गुलमोहर, सुरू, विलायती चिंच यांचा समावेश आहे.

यावेळी विवेक होशिंग यांनी स्थानिक वृक्षांचे महत्त्व सांगत वृक्षसंवर्धनाची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. अतिन त्यागी यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावुन सांगितले. ॲड. जमील देशपांडे यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. तसेच उपक्रमाबातची संकल्पना समजून सांगितली शहरातील आणखी खुल्या भुखंडावर वृक्षारोपण करायचे असल्यास गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठानशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक, जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी, मराठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश

Next Post
जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश

जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d