Saturday, July 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोणवाडी ग्रामपंचायतीचा माहिती दडपशाहीचा खेळ?;अर्जदाराकडून प्रथम अपील दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2025
in जळगाव, माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read
Private:

लोणवाडी -(प्रतिनिधी)- माहितीचा अधिकार अधिनियम-2005 नागरिकांना पारदर्शक व उत्तरदायी शासन मिळावे यासाठी प्रभावी ठरला आहे. मात्र, लोणवाडी ग्रामपंचायत कार्यालयाने या कायद्याकडे दुर्लक्ष करत माहिती दडपशाहीचा मार्ग अवलंबल्याचे दिसत आहे.

ग्रामपंचायत कार्यालय लोणवाडी येथे अर्जदार ॲड.अरुण शिवाजी चव्हाण यांनी दिनांक ०७/०८/२०२५ रोजी  एकूण ३ अर्ज वेगवेगळ्या विषयाबाबत माहिती मिळण्याकामी माहितीचा अधिकार अधिनियम –२००५ अन्वये अर्ज दाखल केले होते. परंतु, या ३ ही अर्जांनबाबत ग्रामपंचायतीने कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. कायद्याने ठरवलेला कालावधी म्हणजेच ३० दिवसांचा कालावधी संपल्यानंतरही माहिती न मिळाल्याने अर्जदाराने पुढील कायदेशीर पाऊल उचलत गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले आहे. जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी यांनी अर्जदारास कोणतीही माहिती उपलब्ध करून न दिल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, ग्रामपंचायतीने माहिती जाणीवपूर्वक लपवली आहे? जनतेसमोर गैरव्यवहार उघड होऊ नयेत यासाठी कागदपत्रे दडवण्यात आली आहेत? कायद्याने बंधनकारक असूनही पारदर्शकता टाळली जात आहे?

                                         ग्रामस्थांच्या मनातील प्रश्न

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्येही शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत.
ग्रामपंचायतीने नेमकी कोणती माहिती लपवली आहे?
ती माहिती समोर आल्यास कोणते अनियमित व्यवहार उघडकीस येऊ शकतात?
गट विकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर अर्जदाराला न्याय मिळणार का?

या प्रकरणामुळे आता संपूर्ण गावकुसात चर्चेला उधाण आले असून, पारदर्शक शासनाच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात आहे. गट विकास अधिकारी प्रथम अपीलावर काय निर्णय देतात, याकडे अर्जदारासह गावकऱ्यांचे व पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा ठेवणाऱ्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त

Next Post

“८१ वर्षांचा शैक्षणिक प्रवास : केसीई सोसायटीचा गौरवशाली उत्सव”

Next Post
“८१ वर्षांचा शैक्षणिक प्रवास : केसीई सोसायटीचा गौरवशाली उत्सव”

“८१ वर्षांचा शैक्षणिक प्रवास : केसीई सोसायटीचा गौरवशाली उत्सव”

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo