लोहारा ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांना कचराकुंडी (डस्टबिन) वाटप पहिल्याच दिवशी 400 कुटुंबीयांनी घेतला लाभ. नागरिकांची गर्दी. ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे नागरिकांनी केले कौतुक!

लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

लोहारा येथे दिनांक 20 रोजी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 15 वित्त आयोग ग्रामपंचायत स्तरातून गावातील कुटुंबांना घरातील ओला कचरा व सुका कचरा अलग टाकण्यासाठी दोन प्रकारच्या लिखित विनामूल्य प्लास्टिकच्या कचराकुंडी लोहारा ग्रामपंचायत तर्फे वाटप करण्यात आल्या यावेळी नागरिकांनी कार्यक्रम स्थळी एकच गर्दी केली होती.

या कचराकुंडी गावातील जवळपास 21 हजार कुटुंबीयांनी वाटप होणार आहे पहिल्याच दिवशी 400 कुटुंबीयांनी या डस्टबिन घेण्याचा लाभ घेतला लोहारा ग्रामपंचायत तिसऱ्या दिवशी गावातील केअर कचरा जमा करण्यासाठी ट्रॅक्टर फिरवते तरीही काही बेजबाबदार नागरिक मुद्दाम गल्लीत केरकचरा फेकतात यामुळे बेजबाबदारपणे कुठेही कचरा टाकून घाण करणाऱ्यांवर नियंत्रण राहण्यास सोबत गाव स्वच्छतेसाठी मदत होईल या हेतूने या कचराकुंडीचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी लोहारा ग्रामपंचायत आवारातील विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे अधिपत्याखाली माजी मुख्याध्यापक अ.अ.पटेल सर यांच्या हस्ते वाटपाला शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गावातील मान्यवरांमध्ये शिवराम भडके, माजी सरपंच अमृत चौधरी, पत्रकार ईश्वर खरे,ग्रामपंचायत सदस्य ईश्वर भाऊ देशमुख ,अशोक चौधरी ,सुरेश मोरे, अशोक क्षीरसागर, हिरालाल जाधव ,भारत पाटील ,गुणवंत सरोदे ,बापू पाटील, संभाजी लिंगायत ,दिनकर गीते ,अशोक बोरसे ,मनोज सोनार ,सुभाष जाधव ,गजानन चौधरी , विजय चौधरी, अनिल निकुंभ ,विजय पाटील ,गफ्फार मिस्तरी आदी मान्यवर हजर होते.










