लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा येथे गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ज्या लोहारा -म्हसास लघुपाटबंधारे धरणातून गावाला पाणीपुरवठा केला जातो,त्या धरणात तर आता मृत साठाही शिल्लक नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे.
धरणातील ही आजची बोलकी छायाचित्रे.
जानेवारी मध्ये सत्यमेव जयते न्यूजचे पाणी उपसा करणार्याचा बंदोबस्त करावा म्हणून वृत्त प्रकाशित केले होते. त्या वेळेस धरणात जवळपास 40 ते 50 टक्के जलसाठा शिल्लक होता.

मात्र पाटबंधारे विभाग,तहसीलदार सो,प्रांताधिकारी सो.यांनी त्या वेळेस जातीने लक्ष दिले असते तर ही वेळ लोहारा,म्हसास,रामेश्वर या गावांना आली नसती.

केवळ संबंधित अधिकारी यांच्या जाणून-बुजून दुर्लक्षित पणामुळेच आज गावाला भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. सुमारे तीन वर्षापासून वाघुर धरणातीच्या पाणी पुरवठा पाईप लाईन चे काम सुरू आहे, तरी ग्रामस्थांच्या हांड्या मध्ये वाघुर धरणाच्या जलाशयाचे पाणी आले नाही. वाघुर धरणाच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजा बाबत संबंधित ठेकेदार यांच्या बद्दल ग्रामस्थांनमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे.

धरणात लवकर पाणीसाठा व्हावा,म्हणून ग्रामस्थ वरून राजाला साकडे घालत आहे.











