Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडाळी दिगर शाळेत “वाढवुया आपुला मान,करू स्वच्छतेचा सन्मान” उपक्रम आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
वडाळी दिगर शाळेत “वाढवुया आपुला मान,करू स्वच्छतेचा सन्मान” उपक्रम आयोजन

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व रुजण्यासाठी आयोजन

जामनेर(प्रतिनीधी)-  तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडाळी दिगर येथे १ जानेवारी २०२० या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून “वाढवूया आपला मान,करूया स्वच्छतेचा सन्मान” या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाविषयी माहिती देताना उपशिक्षक संदिप पाटील यांनी सांगितले की शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व रुजवणे फार महत्वाचे आहे यासाठी “”वाढवुया आपुला मान, करू स्वच्छतेचा सन्मान” हा उपक्रम वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू केला आहे.या उपक्रमांतर्गत दररोज दैनिक परिपाठाच्या वेळेस विद्यार्थ्यांना स्वच्छता,नीटनेटकेपणा याविषयी माहिती देण्यात येईल व जे विद्यार्थी स्वच्छ गणवेशासह, नीटनेटक्या राहणीमानात व वेळेवर शाळेत उपस्थित असतील त्या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनी निवडून त्यांचे कौतुक करण्यात येईल तसेच त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांना एक “विशेष बॅच” लावण्यात येईल. त्या “विशेष बॅच” मुळे विद्यार्थ्यांची वेगळी ओळख निर्माण झाली असेल याचा फायदा म्हणजे इतर विद्यार्थी देखील प्रेरणा घेतील व जास्तीत जास्त विद्यार्थी स्वच्छता, नीटनेटकेपणा हे गुण अंगीकारतील. या स्वच्छतेच्या सवयींमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील चांगले व सुदृढ राहण्यास मदत होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक योगेश काळे यांचे मार्गदर्शन लाभत असून उपशिक्षक निलेश भामरे यांनी व्यवस्थापन केले. वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी नववर्षाचे केले पर्यावरणपूरक स्वागत

Next Post

कर्जमुक्तीच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याशी आधार क्रमांक संलग्न करावा- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

कर्जमुक्तीच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याशी आधार क्रमांक संलग्न करावा- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo