Tuesday, July 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह २ जण ताब्यात;३६ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2025
in क्राईम, जळगाव
Reading Time: 23 mins read
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह २ जण ताब्यात;३६ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई

जळगाव –(प्रतिनिधी)- ला.प्र. विभाग, जळगावने मोठी सापळा कारवाई करत भ्रष्टाचाराविरोधातील आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. सामाजिक वनीकरण विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी आणि इतर दोन कर्मचारी मिळून शेतकऱ्याकडून 36 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले.

सविस्तर वृत्त असे की,

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या तसेच त्यांच्या तीन नातेवाईकांच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर बांबू आणि अमृत महोत्सवी फळझाड/फुलपिक लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून लाभ मिळावा यासाठी ४ फाईल्स मंजुरीसाठी दाखल केल्या होत्या.

दि. २३ जुलै रोजी तक्रारदार वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापूरे (५४) यांना भेटले असता त्यांनी प्रत्येकी १०,०००/- (दहा हजार)  असे एकूण ४०,०००/- (चाळीस हजार)  रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ३६,०००/- (छत्तीस हजार)  रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराला ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक  ५ ऑगस्ट रोजी ला.प्र. विभाग, जळगाव कार्यालयात तक्रार नोंदवली.

कारवाई बाबत सविस्तर माहिती तक्रारीनंतर पडताळणी करण्यात आली. आरोपी क्रमांक १ (मनोज कापूरे) व आरोपी क्रमांक २ (निलेश मोतीलाल चांदणे – ४५ वर्षे, लिपीक) यांनी ४ फाईल्स मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याचे पंचांसमक्ष स्पष्ट झाले. त्यांनी ३५,०००/- स्वतःसाठी व १,०००/- (एक हजार) आरोपी क्र. २ साठी असे ३६,०००/- (छत्तीस हजार)  रुपये घेण्याचे ठरवले.

रक्कम आरोपी क्रमांक ३ कैलास भरत पाटील (२७ वर्षे, कंत्राटी चालक) यांच्याकडे घेण्याचे ठरवले गेले. त्यानुसार, पंचांसमक्ष कैलास पाटील याने लाच स्वीकारताच तीनही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन, जळगाव येथे आरोपींवर गुन्हा दाखल करून, तसेच, हॅश व्हॅल्यू सुरक्षित करण्यात आली आहे.

सदर कारवाई  मा. श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव यांनी केली असून पुढील तपास तपास अधिकारी: श्री. हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., जळगांव हे करीत आहे.

 

 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“ग्राम सडक योजना कामकाजाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!”

Next Post

RFO मनोज कापूरे सह दोघ आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी

Next Post
RFO मनोज कापूरे सह दोघ आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी

RFO मनोज कापूरे सह दोघ आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo