Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार केल्याबद्दल आणखी एकास अटक

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार केल्याबद्दल आणखी एकास अटक

मुंबई(प्रतिनिधी)- वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार केल्याबद्दल आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केल्याबद्दल आणखी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

संतोषकुमार धांदरिया असे त्यांचे नाव आहे. त्यांनी संतोष सिल्क मिल्स. मे. स्वीटी एंटरप्रायझेस, मे. भामवती क्रिएशन अॅड कीर्ती एजन्सी या नावे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत.

ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्री व्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. संतोषकुमार धांदरिया यांनी दिलीप टिबरेवाल व इतर यांच्याकडून रू.119.61 कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रु. 8.16 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला.

दिलीप टिबरेवाल या व्यक्तीस वस्तू व सेवाकर विभागाने यापूर्वीच खोटी देयके निर्गमित करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.संतोषकुमार धांदरिया यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर कायदा 2017, च्या कलम 69 अन्वये आज अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने संतोषकुमार धांदरिया यांना दि.30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने याद्वारे करदात्यांस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यानुसार कर भरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याबाबत पुनःश्च एकदा आवाहन केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

नाशिकच्या सायकलस्वारांचा दिल्लीकरांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next Post

व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्यात यावी -मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo