Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी- आ. चिमणराव पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/12/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

ग्रामीण भागात निपाणे येथे एरंडोल तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन दिमाखात संपन्न, जि.प. अध्यक्षांसह आमदार, जि.प. शिक्षण सभापतींची उपस्थिती

निपाने/एरंडोल(प्रतिनीधी)- येथील संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालयात गटसाधन केंद्र शिक्षण विभाग पंचायत समिती एरंडोल च्या वतीने दिनांक ९व१०डिसेंबर दोन दिवसीय एरंडोल तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. पहिल्या दिवशी उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ना. उज्वला ताई मच्छिंद्र पाटील या होत्या, तर उद्घाटक म्हणून एरंडोल पारोळा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार  चिमणराव पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जि.प. शिक्षण विभागाचे शिक्षण सभापती  पोपटराव भोळे, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, पं.स. उपसभापती अनिल महाजन ,पं.स. सदस्य विवेक पाटील, जि.प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव शिवाजीराव पाटील परिसरातील सर्व सरपंच आजी-माजी पदाधिकारी गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, पं.स. शिक्षण विस्ताराधिकारी जे डी पाटील, संस्थेचे मुख्याध्यापक संदीप महाजन व सर्व शिक्षक वृंद केंद्रप्रमुख संघटनेचे रवींद्र लांळगे व सर्व केंद्रप्रमुख, शिक्षण विभागाचा सर्व स्टॉप गटसाधन केंद्राचे सर्व विषय तज्ञ व सर्व स्टाफ सर्व शाळांचे मुख्याध्यापक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी केले व विज्ञान प्रदर्शन आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे उद्घाटक एरंडोल पारोळा मतदारसंघाचे आ. चिमणराव पाटील यांनी नवीन पिढीने विज्ञानाची कास धरावी, जीवनात सर्वांनी अभ्यासू वृत्ती जोपासावी असे आवाहन केले व विज्ञानामुळे नवीन प्रयोगाची संधी असल्याचे म्हटले. जि.प. शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी माझ्या कार्यकाळात सर्व तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भेट देऊन मागील काही वर्षांपासून मी जिल्हाभरात बारकाईने मी पाहणी केली असता जिल्हा परिषद शाळा व ग्रामीण भागातील विद्यार्थी नवनवीन प्रयोग करतात हे पाहून समाधान वाटत असल्याचे म्हटले. जि.प सदस्य नानाभाऊ महाजन यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतानाच विज्ञानाचे महत्त्व  सर्वांनी स्वीकारावे असे म्हटले. प्राथमिक शिक्षक गटात ४२, माध्यमिक गटात ३०, उच्च प्राथमिक गटात ३९, माध्यमिक शिक्षक ११, परिषद ५, असे व १४५, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राध्यापक मिलिंद पाटील, हेमंत पाटील व पि के पाटील यांनी परीक्षण केले.

दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण व समारोपीय व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष  संजय पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड, व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर, शरद ठाकूर, भाईदास पाटील, संदीप महाजन, पी एस पाटील संत हरिहर माध्यमिक विद्यालयाचा सर्व स्टॉप आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, ग्रामीण भागातील विज्ञान प्रदर्शन मॉडेल विद्यार्थ्यांना संशोधनाची चालना मिळायला पोषक वातावरण तयार होत असून आता संशोधनाची नवनवीन दालन खुले असून भारत देशाला वैभवशाली परंपरा लाभलेली आहे म्हणून विद्यार्थ्यांनी सर्व थोर शास्त्रज्ञ यांचे जीवन अभ्यासून आपल्या व्यक्तिगत जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा व अंधश्रद्धेला आणि अनिष्ट रूढीपरंपरेला तिलांजली द्यावी. जीवनात यश अपयश महत्त्वाचे नसून सहभाग व प्रयत्न महत्वाचे आहेत म्हणून बक्षीस मिळाले नाही किंवा नंबर आला नाही त्यांनी नाउमेद होता कामा नये. अनुभवाने देखील माणसाचे जीवन समृद्ध होते प्रत्येक गोष्टीतून आपल्याला नवनवीन अनुभव मिळतात व त्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळते असे सांगताना किशोर पाटील कुंझरकर यांनी उपस्थित सर्वांनाच हात उंच करायला लावून भारत देश महासत्ता होण्यासाठी सर्वांनी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न सह जीवनात सर्वत्र वैज्ञानिक जाणिवा विकसित करण्याचा संकल्प देत नेहमीप्रमाणे खास आपल्या कुंझरकर शैलीत शपथ दिली असता वातावरण चैतन्यमय झाले होते. विद्यार्थ्यांनी जीवनात छोट्या छोट्या गोष्टी पडताळून पाहून चिकित्सक दृष्टिकोन ठेवत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे हे अनेक उदाहरणासह स्पष्ट करून त्यांनी म्हटले असता सर्वांनी जोशात दाद दिली. गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज स्पष्ट केली तर गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी सहभागी सर्वांचे कौतुक केलं. विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी मंजुष्री गायकवाडगटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर आदि मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इंडियन रेडक्रॉस रक्तपेढीला शासनाचे लाखोंचे अनुदान प्राप्त;माहिती अधिकाराला केराची टोपली?

Next Post

भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनानिमित्ताने ‘हॉलिडे वर्क’ निसर्गचित्रांचे प्रदर्शन

Next Post
भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनानिमित्ताने ‘हॉलिडे वर्क’ निसर्गचित्रांचे प्रदर्शन

भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनानिमित्ताने 'हॉलिडे वर्क’ निसर्गचित्रांचे प्रदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d