Tuesday, December 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर;राज्यात 21 आक्टोंबरला मतदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

नवी दिल्ली- महाराष्ट्रासाठी  विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. राज्यात 21 ऑक्टोबर 2019  रोजी मतदान पार पडणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी  होणार आहे. 

             येथील ‘निर्वाचन सदन’ या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि हरियाणा  राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा पोटनिवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा यावेळी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे.   

     असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

            महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून 5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छानणी होणार आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 21 ऑक्टोबर ला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 27 ऑक्टोबरला  राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे.

राज्यात 8 कोटी 95 लाख

        केंद्रीय  निवडणूक आयोगाच्यातवीने  जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2019 पर्यंत राज्यात मतदारांची  एकूण संख्या  8 कोटी 95 लाख 62 हजार 706 एवढी आहे. 2014 च्या तुलनेत  राज्यातील  मतदान केंद्रांमध्ये 5.61 टक्यांनी वाढ झाली असून यावर्षीच्या विधानसभेसाठी  एकूण 95 हजार 473 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 28 लाख रूपये ठेवण्यात आली आहे. 

            मतदार व उमेदवारांसाठी ‘हेल्पलाइन’ व ‘ॲप’ची सुविधा

मतदारांच्या मदतीसाठी आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन-1950’ सुरु केली आहे. 1950 या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येणार आहे. मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु करण्यात आले आहे. उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जाची स्थिती व प्रचार विषयक परवानगीसह अन्य महत्वाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘सुविधा ॲप’ सुरु करण्यात आले आहे. उमेदवार, राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वतीने प्रतिनीधी  थेट  https://suvidha.eci.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करू शकतो व  उमेदवारांना ॲपवर परवानगीबाबतची स्थिती कळू शकणार आहे.   

   आचार संहिता काळात असे असणार नियम

निवडणूक काळात आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. निवडणूक प्रचार काळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यावरण पुरक प्रचार साहित्य व माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

संवेदनशील मतदानकेंद्रांवर व्हिडीओग्राफी,सीसी टीव्ही आणि वेबकास्टींग करण्यात येणार आहे.   प्रसार माध्यमांमधून आचार संहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र नियंत्रण केंद्र  उभारण्यात येणार आहे.

सोशल मिडीयाद्वारे प्रचारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता

निवडणूक काळात प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्वीटर, युटयूब, व्हाट्सअप आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठीत करण्यात आलेल्या ‘सोशल मिडीया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्रा’चे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मिडीयावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.  

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गृह उद्योगाचे गाजर दाखवून जिल्ह्यात होतेय महिलांची आर्थिक फसवणूक

Next Post

विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेत अँड्रॉइड शालेय अँप्लिकेशनचे उदघाटन उत्साहात

Next Post

विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेत अँड्रॉइड शालेय अँप्लिकेशनचे उदघाटन उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d