Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विमानतळ आणि रेल्वेमार्गाच्या कामाला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
विमानतळ आणि रेल्वेमार्गाच्या कामाला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोली जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज रुग्णालय उभारण्यास तत्वतः मंजुरी

रुग्णालयासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश

मुंबई, दि. 24 :- मागास, अदिवासी आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूद करण्यासोबतच तिथे तज्ज्ञ स्टाफच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यात जलद येजा करता यावी तसेच कोनसरी लोहखनिज प्रकल्पाला मदत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात विमानतळ आणि गडचिरोली -कोनसरी या रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आज मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील हे दूरदृष्यप्रणाली मार्फत उपस्थित होते, तर  सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव (नियोजन) नितीन गद्रे, प्रधान सचिव (नागरी विमान) श्रीमती वल्सा नायर, वित्तिय सुधारणा सचिव श्रीमती ए शैलजा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला उपमुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

पालकमंत्री श्री. शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात होणारे नक्षलवाद्यांचे हल्ले आणि त्यात जखमी होणाऱ्या पोलीसांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यात सर्व सोयींनी युक्त अशा रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. याठिकाणी लष्कराच्या धर्तीवर दिडशे खाटांचे सामान्य रुग्णालय तयार करावे आणि त्यातील 50 खाटा या ट्रॉमा केअरसाठी राखीव ठेवाव्यात असे यावेळी निश्चित करण्यात आले. या नव्याने तयार होत असलेल्या रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय यासारख्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, याठिकाणी नेमणूक देतांना डॉक्टरांना विशेष पॅकेज देऊन तज्ज्ञ स्टाफची नेमणूक करण्यासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यासह इतर तज्ज्ञ लोकांचा समावेश करावा, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

दोनशे एकर जमिनीवर विमानतळ

गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण अधिक गतिमान व्हावे यासाठी जिल्ह्यात सुमारे 200 एकर जमिनीवर विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या जमीनीची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी ही माहिती विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवावी असे श्रीमती वल्सा नायर यांनी सांगितले. तर, विमानतळ उभारणीसाठी एअरपोर्ट अथॉरिटी कडून शक्यता (फिजीबलीटी) तपासून घेऊन यासाठी लागणारी तांत्रिक पाहणी करण्यासाठी नागपूर येथून तज्ज्ञ व्यक्ती पाठविण्यात येईल, असे श्री. कपूर म्हणाले.  त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

गडचिरोली-वडसा- कोनसरी रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य शासन रेल्वेला संमतीपत्र देणार

गडचिरोली जिल्हातील गडचिरोली- वडसा- कोनसरी हा   रेल्वे मार्गाच्या उभारणीला 2015 साली मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती. मात्र हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि वित्तीय मान्यता मिळणे अद्याप बाकी होते. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कोनसरी येथील प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाला त्याचा फायदा होईल तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध मिळवून देणे शक्य होईल त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आले. त्यानुसार या प्रकल्पाबाबत रेल्वेला तत्काळ संमतीपत्र देऊन त्यानंतर सुधारित वित्तीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणून तो संमत करून घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

गडचिरोली ते कोनसरी हा 60 किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार होऊन गडचिरोली रेल्वेमार्गाने जोडला गेल्यास हा दुर्गम भाग रेल्वेने जोडला जाईल, तसेच या भागात अनेक उद्योजक आकर्षित होतील आणि रोजगारास चालना मिळेल, नक्षल भागात रोजगार निर्मिती झाल्यास त्याचा फायदा इथला नक्षलवाद कमी होण्यास होईलच पण त्याचबरोबर  शासनाच्या महसुलातही वाढ होईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाच्या कामांसाठी ८१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर

Next Post

मृद संधारण प्रकल्पांचे आणि पाणलोट विकास योजनेअंतर्गत निर्णय घेण्याकरिता राज्यस्तरीय मान्यता समितीची स्थापना

Next Post
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

मृद संधारण प्रकल्पांचे आणि पाणलोट विकास योजनेअंतर्गत निर्णय घेण्याकरिता राज्यस्तरीय मान्यता समितीची स्थापना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo