Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वृक्ष लागवडीसह संवर्धन गरजेचे- फिरोज शेख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
वृक्ष लागवडीसह संवर्धन गरजेचे- फिरोज शेख

जळगांव- (चेतन निंबोळकर) -शासकीय पातळीवर जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. कालांतराने शासकीय यंत्रणेला तसेच सामाजिक संस्थांना या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच सामाजिक संस्थांचा कल आहे.  याच अनुषंगाने शहरातील शिवकाँलनी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशनच्या वतीने भारतीय प्रजातीचे कडूनिंब, चिंच, आंबा तसेच छायादार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी प्रत्येक मुलाला वर्षभरासाठी एक रोप दत्तक देऊन, त्या रोपाचे योग्य ते संवर्धन केल्यास त्या विद्यार्थ्याला पुढील वर्षी मोफत शैक्षणिक साहित्य दिले जाईल, असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी दिले.या विद्यार्थ्यांना दिली दत्तक झाडे:- पुनम पाटील, चेतना पवार, ऐश्वर्या बारी, जय भावसार, कौसर शेख, चेतन सपकाळे, दर्शन राठोड, भाविका सोनगडा, दर्शन चौधरी, नम्रता बारी  यावेळी, शाळेचे चेअरमन तथा ग.स.सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील सर, संस्था अध्यक्ष फिरोज शेख, प्रा. मनोज भालेराव, चेतन निंबोळकर, मुख्याध्यापिका सौ.वसाणे मॅडम, सौ. भारंबे मॅडम, सौ. ब्राम्हणकर,सौ.सविता ठाकरे, सुदर्शन पाटील, रवी शिंदे, शरद बिऱ्हाडे, सुवर्णा अडकमोल आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“वृक्षारोपण -संवर्धन काळाची गरज”

Next Post

धोकादायक गर्भनिरोधके

Next Post
धोकादायक गर्भनिरोधके

धोकादायक गर्भनिरोधके

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo