Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

व्ही.शांताराम जीवन गौरव, राजकपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह; मुख्यमंत्र्यांच्या  सुचनेनंतर शासन निर्णय जारी

मुंबई(प्रतिनिधी)- व्ही. शांताराम जीवन गौरव, राजकपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या समितीचा कालावधी शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना होण्यापर्यंत असणार आहे.

व्ही. शांताराम जीवन गौरव आणि विशेष पुरस्कार निवड समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे अध्यक्ष तर सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य असतील. तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सतीश रणदिवे, ज्येष्ठ अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री रेणुका शहाणे, निर्माता आणि दिग्दर्शक किरण शांताराम हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य असणार आहेत.राजकपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे अध्यक्ष तर सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य असतील.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. तर निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, निर्माता, दिग्दर्शक आणि नागराज मंजुळे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य असणार आहेत.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट करण्यात येणार -सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

Next Post

महिलांविषयक कौटुंबिक कायद्यांच्या जनजागृतीची गरज -महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Next Post
शासकीय सेवेतील पती-पत्नी एकत्रीकरण, महसूल विभाग बदलण्याच्या मुद्यांचे पालन गरजेचे -महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

महिलांविषयक कौटुंबिक कायद्यांच्या जनजागृतीची गरज -महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d