Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरात डांबरी रस्ते करताना प्लास्टिकचा उपयोग होणार, फिस्ट फाऊंडेशन, इनरव्हील क्लबचे निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शहरात डांबरी रस्ते करताना प्लास्टिकचा उपयोग होणार, फिस्ट फाऊंडेशन, इनरव्हील क्लबचे निवेदन

जळगाव, दि.१५ – जळगाव शहरात नवीन रस्ते तयार करण्याची कामे गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. त्यातच अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची पार वाट लागली. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघातात काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे दुखणे जडले. जळगाव शहरात नुकतेच रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली ही जळगावकरांसाठी चांगली बाब आहे. शहरातील रस्ते तयार करताना डांबरसोबत प्लास्टिकचा देखील उपयोग करावा, अशी मागणी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना करण्यात आली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्यांसाठी पुढील निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिक वापराची अट नमूद करण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या.

जळगाव शहरात डांबरी रस्ते करताना ते गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ होण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार डांबरसोबत प्लास्टिक बिटूमीन्स देखील त्यात वापरावे, अशी मागणी करण्यासाठी मंगळवारी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची भेट घेतली. प्रसंगी फिस्ट फाऊंडेशनचे सकिना लहरी, चेतन वाणी, कल्पक सांखला, लक्ष्मी सांखला, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नेहा संघवी, इशिता दोशी, नफिसा लहरी आदी उपस्थित होते.

फिस्ट फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, शहरातील रस्त्यांचे काम करताना ते गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मक्तेदारावर जबाबदारी करणारे एक परिपत्रक काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे. शहरात आता नव्याने तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला ते लागू करण्यात यावे. रस्ते किमान पुढील १० वर्ष टिकावे यासाठी आताच कामाच्या निविदेत आवश्यक तो बदल करावा, रस्त्यांची कामे पूर्ण होण्यापूर्वी त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती, ड्रेनेज, इतर केबल संदर्भातील कामे पूर्ण झालेली आहेत की नाही याची खात्री मनपा प्रशासनाकडून करवून घेण्यात यावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा रस्ता खोदकाम करण्याची आवश्यकता भासणार नाही. जळगाव शहर विकासाच्या टप्प्यावर येऊन ठेपले असून शहरात प्रायोगिक तत्वावर एक रस्ता प्लास्टिक वेस्टचा उपयोग करून तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड म्हणाल्या, उदगीर येथे असताना त्यांना प्लास्टिक वेस्टपासून रस्ता तयार करण्याचा उपक्रम राबविला होता. जळगावात देखील असा उपक्रम राबवता येऊ शकतो. पर्यावरण संवर्धनासाठी जळगाव मनपा प्रयत्नशील असून अनेक उपक्रम विविध संस्थांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. जळगावात डांबरी रस्त्यांच्या नवीन कामांची निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिकचा उपयोग करण्याचे नमूद करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी अभियंत्यांना दिल्या. फिस्ट फाऊंडेशनच्या सदस्यांशी पुन्हा भेटत चर्चा करण्याचे देखील मनपा आयुक्त म्हणाल्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post

भडगांव : लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत विद्यार्थी प्रवेशात्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post
भडगांव : लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत विद्यार्थी प्रवेशात्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

भडगांव : लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत विद्यार्थी प्रवेशात्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d