Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना 

नांदेड(प्रतिनीधी)- देशभरात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणीची चर्चा सुरू असताना, तसेच अशा अत्याचारांबाबत जनजागृतीही सुरू असताना नांदेडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे उघड झाले आहे. बिलोली तालुक्यातील ४ शिक्षकांनी गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात या चार नराधमांविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनी साईबाबा विद्यालयात शिकते. हे विद्यालय नांदेड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किमीच्या अंतरावर आहे. या चार शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ देखील दाखवला. घडलेल्या सारा प्रकार या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर विद्यालय परिसरात खळबळ उडाली. या अत्याचारानंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

५ जणांवर गुन्हे दाखल

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके अशी या अत्याचार करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हे चारही शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार झाले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वप्न आणि जीवन-लेखन-शितल शांताराम पाटील

Next Post

मानवी मायक्रोबायोम – आपल्या शरीराने सूक्ष्मजीवांकडून साधित केलेली बुद्धिमत्ता-डॉ. गिरीश ब.महाजन व श्रीमती. दिपाली राहुल फाटक

Next Post
मानवी मायक्रोबायोम – आपल्या शरीराने सूक्ष्मजीवांकडून साधित केलेली  बुद्धिमत्ता-डॉ. गिरीश ब.महाजन व श्रीमती. दिपाली राहुल फाटक

मानवी मायक्रोबायोम - आपल्या शरीराने सूक्ष्मजीवांकडून साधित केलेली बुद्धिमत्ता-डॉ. गिरीश ब.महाजन व श्रीमती. दिपाली राहुल फाटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo