Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवनेरी फाउंडेशन व भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
शिवनेरी फाउंडेशन व भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

चाळीसगाव मतदारसंघ पिंजून काढत घेतली प्रचारात आघाडी, महिलांचा लक्षणीय सहभाग

चाळीसगाव – (प्रतिनिधी) – भाजपा व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अगोदरच प्रचारात आघाडी घेतली आहे . ते उमेदवार असले तरी मतदारसंघात त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण या देखील प्रचारात मागे नाहीत. प्रतिभाताई यांच्या प्रचाराची तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास शहरी भागाबरोबरच संपूर्ण ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचारात सक्रीय झाले आहेत.अशातच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी अर्ज दाखल करण्या आगोदरच पहिल्या टप्प्यात चाळीसगाव शहराचा प्रचार दौरा पुर्ण करुन दुसऱ्या टप्प्यात आता ग्रामीण भागात जि.प. गटानूसार प्रत्येक घरोघरी जाऊन दुसऱ्या टप्प्यात देखील प्रचार पुर्णत्वास नेत आहेत. अशा प्रकारे त्यांनी महिला पदाधिकारी व विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबतीने आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. सगळीकडे इतर उमेदवारांनी दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू केला असतानाच सौ.प्रतिभाताईंनी मात्र प्रचार पुर्णत्वास नेत एकप्रकारे रेकॉर्ड स्थापन केले असून चाळीसगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात प्रतिभाताईंच्या प्रचाराचे व धडाडीचे कौतुक होत आहे. यादरम्यान गावोगावी आणि घरोघरी महिला आणि तरुणींचा ताईंना भरभरून प्रतिसाद मिळत असून यावरुन दिसत आहे कि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी लाडक्या बहिणींसाठी जे कार्य केले आहे त्याचीच ही फलश्रुती म्हणून सौ.प्रतिभाताईंजवळ भावनिक होऊन अनेक माता भगिनीं आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. आणि आमदार मंगेशदादा चव्हाण व प्रतिभाताईंना भरभरून आशीर्वाद देत आहेत. त्यांच्यासोबत महिला आघाडीचा देखील मोठा व्यापक सहभाग प्रचारादरम्यान दिसून येत आहे. एक प्रकारे संपूर्ण तालुक्यात घरोघरी काम पोहोचवण्याचे काम प्रतिभाताई यांनी केले आहे.

“आ.मंगेशदादा चव्हाण त्यांनी चाळीसगाव तालुक्याच्या विकासात भरीव योगदान दिले असून या विकास कामांमुळेच जनता भरभरून विजयाचा आशीर्वाद देत आहे. सर्वच कार्यकर्ते यांच्याबरोबर सर्वसामान्य जनता महिला उस्फूर्त प्रचारात सहभागी होत आहेत; सौ. प्रतिभाताई चव्हाण.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

Next Post

“विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!”

Next Post
“विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!”

"विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d